advertisement

पुण्यात टेम्पो तीव्र उतारावर असतानाच अचानक ब्रेक फेल, समोर धावत्या दुचाकी अन् क्षणात घडलं भयंकर; तळजाई टेकडीवर थरार

Last Updated:

टेकडीच्या तीव्र उतारावरून खाली येणाऱ्या एका टेम्पोचे अचानक ब्रेक निकामी झाले आणि हा अनियंत्रित टेम्पो मृत्यूचा सापळा बनून रस्त्यावरील वाहनांवर धावून गेला.

पुण्यात विचित्र अपघात (फाईल फोटो)
पुण्यात विचित्र अपघात (फाईल फोटो)
पुणे : पुण्यातील निसर्गरम्य तळजाई टेकडी परिसरात मंगळवारी (१० फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास एक भयानक अपघात घडला. टेकडीच्या तीव्र उतारावरून खाली येणाऱ्या एका टेम्पोचे अचानक ब्रेक निकामी झाले आणि हा अनियंत्रित टेम्पो मृत्यूचा सापळा बनून रस्त्यावरील वाहनांवर धावून गेला. या भीषण धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
टेकडीच्या उतारावर मृत्यूचं तांडव
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक खुर्शिद आलम हा तळजाई टेकडीवरून पद्मावतीच्या दिशेने जात होता. टेम्पो तीव्र उतारावर असतानाच अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्याने टेम्पोने समोरून जाणाऱ्या दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत अजय गायकवाड आणि दत्तू जाधव हे तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे तळजाई टेकडीवरील वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या भागात अवजड वाहनांना बंदी असतानाही टेम्पो आणि इतर वाहने खुशाल वावरत आहेत. टेकडीचा उतार धोकादायक असल्याने येथे वारंवार अपघात होतात, तरीही तेथे ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. स्थानिक नागरिकांनी या अपघातानंतर संताप व्यक्त केला असून, प्रशासनाने अवजड वाहतुकीवर कडक निर्बंध घालावेत आणि तीव्र उतारावर गतिरोधक किंवा सुरक्षा कठडे बसवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात टेम्पो तीव्र उतारावर असतानाच अचानक ब्रेक फेल, समोर धावत्या दुचाकी अन् क्षणात घडलं भयंकर; तळजाई टेकडीवर थरार
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement