advertisement

टरमाळी... रुचिताचा राखीशी पंगा, चुस्तानी बनून ड्रामा क्विन उतरवणार माज, VIDEO

Last Updated:

रुचिताने राखीशी पंगा घेतला असून आता राखी तिचा कसा माज उतरवणार हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. राखीचा मस्तानी लुक पाहणं मजेशीर ठरणार आहे.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 मध्ये राखी सावंतची एन्ट्री होताच नवा ड्रामा ड्रामा, टोमणे आणि वाद चांगलेच रंगले आहेत. सध्या अशाच एका व्हिडीओमुळे राखी आणि रुचिता या दोघी जोरदार चर्चेत आल्या आहेत. बिग बॉसच्या अपकमिंग एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यात राखी आणि रुचिता यांच्यात चांगलीच खडागंजी झाली आहे. रुचिताने राखीशी पंगा घेतला असून आता राखी तिचा कसा माज उतरवणार हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखीने 'मस्तानी' सारखा लुक केला आहे. मात्र ती स्वतःला मस्तानी नव्हे तर 'चुस्तानी' म्हणतेय. "मी मस्तानी नाही, चुस्तानी बाई आहे. सगळ्यांचं रक्त चुसणार", असं म्हणत ती तिच्या नेहमीच्या बिनधास्त अंदाजात सगळ्यांना इशारा देते. इतकंच नाही तर ती घरातील इतरांना कामं सांगताना देखील दिसते. "ऐ, माझी भांडी घास, माझे कपडे धू", असे आदेश देखील देताना दिसतेय. तिनं थेट रुचिताला तिचे कपडे धुवायला सांगितले.
advertisement
राखीच्या या बोलण्यावर रुचिता देखील गप्प बसत नाही. ती लगेचच प्रत्युत्तर देते. ठअशी कपडे धुवेन ना, परत घालायला पण काही राहणार नाही. पंगे घ्यायच्या आधी 10 वेळा विचार कर टरमाळी". दोघींमधील ही भांडणं घरातील सदस्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एंटरटेनमेंटचा डोस ठरत आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



advertisement
यानंतर रुचिता राखीचे कपडे घेऊन थेट स्विमिंग पूलजवळ जाते. ती राखीला विचारते, "हे कपडे धुवायचे आहेत का?" या सीनमुळे वातावरणात आणखीच रंगत येते.
हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून दोघींच्या स्टाईलवर आणि डायलॉग्सवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही जण राखीच्या बिनधास्त स्वभावाचं कौतुक करत आहेत, तर काहींना रुचिताचं प्रत्युत्तर आवडलं आहे. येत्या भागांमध्ये या वादाचं पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
टरमाळी... रुचिताचा राखीशी पंगा, चुस्तानी बनून ड्रामा क्विन उतरवणार माज, VIDEO
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement