चेहरा किंवा वजनाबाबत टोमणे मारू नका : मुलांच्या रूप किंवा वजनाबाबत मजाक किंवा टीका करू नका. हे त्यांच्या आत्मसन्मानावर परिणाम करू शकते आणि त्यांना सतत निराश वाटू शकते.
चुका वारंवार आठवून देऊ नका : मुलांच्या चुका वारंवार समोर आणल्यास त्यांना कमीपणाची भावना निर्माण होते. त्याऐवजी त्यांच्या चांगल्या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करा.
advertisement
आवडीनिवडीकडे दुर्लक्ष करू नका: मुलांच्या छंद किंवा आवडीनिवडींना कमी लेखल्यास त्यांच्या सर्जनशीलतेवर परिणाम होऊ शकतो.
अभ्यासावरून सतत बोलू नका : मुलांच्या शाळेतील कामगिरीवर नेहमी नकारात्मक बोलू नका. यामुळे त्यांना मानसिक ताण निर्माण होऊ शकतो.
मित्रांवरून रागावू नका : मुलांच्या मित्रांबाबत वाईट बोलण्याआधी त्यांच्या भावना लक्षात घ्या. मित्र त्यांच्या आयुष्यात महत्वाचे भाग असतात.
इतर मुलांशी तुलना टाळा : आपल्या मुलांची इतर मुलांच्या यशाशी तुलना करणे चुकीचे आहे. यामुळे मुलांना कमीपणाची भावना निर्माण होऊ शकते.
भावनांकडे दुर्लक्ष करू नका : मुलं आपल्या भावना व्यक्त करत असतील तर त्यांना दुर्बल समजणे चुकीचे आहे. त्यांना मोकळेपणाने बोलण्याची संधी द्या.
निर्णय स्वातंत्र्य द्या : मुलांना त्यांच्या निर्णयांमध्ये सहभागी होऊ द्या. वारंवार हस्तक्षेप केल्यास त्यांच्यातील आत्मनिर्भरता कमी होते.
सन्मान ठेवा : त्यांच्या गोष्टी तपासणे विश्वास कमी करते. त्यांच्यावर शंका घेणार्या गोष्टी करू नका.
सामाजिक कौशल्यांवर टिप्पणी करू नका : मित्रांच्या बाबतीत नकारात्मक गोष्टी सांगणे त्यांचा आत्मविश्वास कमी करते. वरील बाबींवर लक्ष दिल्यास मुलं आपल्या जवळीक वाढवतील आणि आपल्याशी मोकळेपणाने संवाद साधतील.
