रेल्वे प्रवासासह नियोजित केलेले हे पॅकेज आरामदायी, सुरक्षित आणि बजेट फ्रेंडली आहे. या पॅकेजचे नाव 'Splendid Hyderabad with Ramoji ex-Mumbai' असे असून हे पॅकेज खास मुंबईहून सुरू होते. आयआरसीटीसीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या टूरमध्ये प्रवास, निवास आणि प्रमुख पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
किती दिवसांचे आहे पॅकेज?
हे पॅकेज प्रत्येक गुरुवारी उपलब्ध आहे. मुंबईहून निघणारे हे पॅकेज एकूण 4 रात्री आणि 5 दिवसांचे आहे. या कालावधीत प्रवासासह हैदराबादमधील प्रमुख ठिकाणे आरामात पाहता येतात.
advertisement
कसा असेल संपूर्ण प्रवास?
या टूरसाठी प्रवासाचा प्रकार रेल्वे आहे.
प्रवासाची सुरुवात : CSMT मुंबईहून ट्रेन क्रमांक 12701, रात्री 9:50 वाजता
आगमन : दुसऱ्या दिवशी दुपारी 12:05 वाजता हैदराबाद
परतीचा प्रवास : हैदराबादहून ट्रेन क्रमांक 22731, रात्री 10:35 वाजता
मुंबई आगमन : दुसऱ्या दिवशी दुपारी 1:05 वाजता
काय काय पाहता येणार?
या टूरमध्ये हैदराबादमधील प्रमुख आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
चारमिनार : 1591 साली बांधलेले हैदराबादचे प्रतीक मानले जाणारे ऐतिहासिक स्मारक.
गोलकोंडा किल्ला : कुतुबशाही राजवटीची राजधानी असलेला भव्य किल्ला.
रामोजी फिल्म सिटी : जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटींपैकी एक, जिथे चित्रपट सेट्स, बागा आणि मनोरंजनाची रेलचेल पाहायला मिळते.
पॅकेजचा प्रतिव्यक्ती खर्च
3AC (Comfort Class)
सिंगल : 29,600 रुपये
ट्विन : 17,199 रुपये
ट्रिपल : 15,599 रुपये
चाइल्ड (बेडसह/बेडशिवाय) : 13,499 रुपये
SL (Standard Class)
सिंगल : 27,699 रुपये
ट्विन : 15,099 रुपये
ट्रिपल : 13,499 रुपये
चाइल्ड (बेडसह/बेडशिवाय) : 11,399 रुपये
पॅकेजमध्ये काय काय समाविष्ट असेल?
- येण्या-जाण्याची ट्रेनची तिकिटे (कम्फर्ट - 3AC आणि स्टँडर्ड - SL).
- निवास: हैदराबाद/सिकंदराबादमध्ये 02 रात्री हॉटेलमध्ये मुक्काम.
- प्रवासाच्या कार्यक्रमानुसार सर्व वाहतूक आणि प्रेक्षणीय स्थळे पाहणे (एसी गाडीतून).
- प्रवासाच्या कार्यक्रमानुसार नमूद केलेले जेवण.
- प्रवास विमा.
- जीएसटी.
पॅकेज कसे बुक कराल?
हे टूर पॅकेज IRCTC Tourism च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन बुक करता येते. तसेच अधिक माहितीसाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधता येतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
