फुफुंदी नेमकं काय?
फुफुंदी मावा या रोगामुळे गव्हाच्या कणसातील दाणे पूर्ण विकसित होत नाहीत. त्यामुळे दाणे हलके राहतात, उत्पादन घटते तसेच दाण्याची गुणवत्ता कमी होते. दुसरीकडे करपा रोगामुळे पानांवर पिवळसर व तपकिरी रंगाचे डाग दिसून येतात. यामुळे प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया मंदावते आणि पिकाची वाढ खुंटते. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. सध्या वातावरण दमट असल्याने हे रोग झपाट्याने पसरण्याचा धोका अधिक आहे.
advertisement
फुफुंदी रोगावर उपाययोजना काय
कृषी तज्ज्ञांच्या मते, रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसताच त्वरित योग्य औषधांची फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी व्यवस्थापन योग्य ठेवावे, शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. रोगग्रस्त पाने व झाडांचे अवशेष काढून नष्ट करावेत, जेणेकरून रोगाचा प्रसार थांबवता येईल. संतुलित खतांचा वापर करणे, शिफारस केलेल्या औषधांचीच मात्रा वापरणे आणि फवारणी करताना हवामान कोरडे असण्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
गहू पिकाची काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
सध्याच्या हवामान स्थितीत गहू पिकावर करपा आणि फुफुंदी रोगांचा धोका कायम असल्याने शेतकऱ्यांनी दुर्लक्ष न करता वेळीच उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. वेळेवर काळजी, योग्य फवारणी आणि शेत व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून आपल्या गहू पिकाचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.





