1. नियमित झोपेचा वेळ ठरवा
आपण रोज एकाच वेळेला झोपायला जाऊन आणि उठायला हवे. यामुळे शरीराचा बायोलॉजिकल क्लॉक योग्य प्रकारे काम करतो. रात्री उशीरपर्यंत जागरणे आणि सकाळी उशिरा उठणे, दोन्ही शरीराच्या नैसर्गिक लयाला विस्कटतात आणि झोपेची गुणवत्ता कमी होते.
2. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मर्यादित करा
मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यांचा वापर झोपेच्या अगोदर टाळावा. या उपकरणांपासून येणारा प्रकाश शरीरात मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन कमी करतो, ज्यामुळे झोपेचा चक्र बिघडते. झोपेच्या एक ते दोन तास आधी सर्व उपकरणांपासून दूर राहणे उपयुक्त ठरते.
advertisement
3. हलके अन्न घ्या
रात्री झोपण्याआधी जड किंवा तिखट अन्न खाल्ले तर पचनक्रिया मंदावते आणि शरीर शांत होत नाही. झोपण्यापूर्वी दूध, गोड कढी किंवा हलकी फळं खाणे अधिक फायदेशीर ठरते.
4. योग आणि प्राणायाम
योग आणि प्राणायाम मन शांत करण्याचे उत्तम साधन आहे. विशेषत हा अनुलोम-विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम हे झोपेपूर्वी करणे. याने मन शांत करून मानसिक तणाव दूर होतो आणि हे नियमित केल्यास झोप जलद आणि शांत होते.
5. गरम पाण्याचे शॉवर किंवा आंघोळ
झोपण्याआधी गरम पाण्याने आंघोळ केल्यास शरीराचे स्नायू आरामात येतात. रक्ताभिसरण सुधारते आणि मानसिक ताण कमी होतो, त्यामुळे झोप सुलभ होते.
६. मन शांत करण्यासाठी ध्यान आणि संगीत
झोपेच्या अगोदर साधारण २० ते १५ मिनिटे ध्यान किंवा शांत संगीत ऐकणे मानसिक ताण कमी करते. नैसर्गिक आवाज, हलके पियानो किंवा शास्त्रीय संगीत झोपेच्या आधी ऐकले तर मन शांत होते.(वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)