सकाळची सुरुवात फायदेशीर अशी : सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात लिंबू, आवळा किंवा जिरे मिसळून प्यायल्यास फायदा होतो. यासोबत 5 भिजवलेले बदाम खा. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि चयापचय क्रिया वेगवान होते. यानंतर 30-45 मिनिटे हलका व्यायाम, योगा किंवा चालायला जा.
न्याहारी (Breakfast) : न्याहारीमध्ये कमी फॅट आणि जास्त प्रोटीन असलेले पदार्थ घ्या. यात ओट्स, भाज्या, मोड आलेली कडधान्ये, स्टीम इडली, उपमा किंवा दलिया यांचा समावेश करू शकता. ही न्याहारी पोट बराच काळ भरलेले ठेवेल आणि ऊर्जाही देईल.
advertisement
मध्य-सकाळचा नाश्ता (Mid-morning snack) : मध्य-सकाळच्या वेळी सफरचंद, पपई, संत्री यांसारखी एखादं ताजं हंगामी फळ खाऊ शकता.
दुपारचं जेवण (Lunch) : दुपारच्या जेवणापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतर काकडी, गाजर आणि मुळा यांचा समावेश असलेले एक वाटी सॅलड खा. मुख्य जेवणात 100 ग्रॅम ब्राऊन राइस, डाळ, हिरव्या भाज्या (बटाटे वगळून) आणि फॅट-फ्री दही घ्या. जर तुम्ही मांसाहारी असाल, तर आठवड्यातून दोनदा 100 ग्रॅम ग्रील चिकन किंवा मासे खाऊ शकता. अंड्याचा पांढरा भाग (एग व्हाईट) देखील चांगला पर्याय आहे.
संध्याकाळचा नाश्ता (Evening snack) : संध्याकाळी लिंबू आणि मध मिसळलेला ग्रीन टी प्या. यासोबत भाजलेले चणे, मखाने किंवा उकडलेले मका खा.
रात्रीचं जेवण (Dinner) : रात्रीचं जेवण हलकं आणि लवकर, साधारण साडेसात वाजता करावं. यात मिस्सी रोटी, मिक्स व्हेज सूप, दलिया, क्विनोआ उपमा खाऊ शकता.
झोपण्यापूर्वी : झोपण्यापूर्वी हळद मिसळलेलं कोमट दूध (साय काढलेलं) प्या. हळद अँटी-इंफ्लेमेटरी असते, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होते.
महत्त्वाच्या टिप्स
- दिवसभरात 2-3 लिटर पाणी प्या.
- जंक फूड, तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.
- दिवसभरात थोडे-थोडे जेवण घ्या आणि जास्त खाणे टाळा.
- दररोज 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
- तणाव टाळण्यासाठी ध्यान आणि श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा.
हे ही वाचा : वजन कमी करायचंय? 100 कॅलरीजपेक्षा कमी असलेले 'हे' स्नॅक्स खा, पोट भरेल आणि वजनही घटेल!
हे ही वाचा : Health Tips : जेवणानंतर तुम्हीही खाताय गोड, पण याचे परिणाम माहिती आहेत का? आत्ताच थांबवा, नाही तर…