पांढऱ्या केसांसाठी तिळाचं तेल ठरत उपयुक्त :
जेवणासाठी वापरण्यात येणार तिळाचं तेल हे अँटीऑक्सीडेंटच्या गुणांनी भरपूर असतं. हे केसांना पोषण देण्याचे काम करतं. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी तिळाचं तेल फायदेशीर ठरू शकतं. तेव्हा तिळाच्या तेलात मेथीचे दाणे आणि आवळा मिसळल्याने अनेक फायदे मिळू शकतात.
तिळाच्या तेलात मिसळा मेथी दाणे :
advertisement
डोक्यावर तिळाचं तेल लावण्यापूर्वी ते तेल हलके गरम करून घ्या आणि त्यात एक चमचा मेथीची पावडर मिसळा. तेल जोपर्यंत काळ होत नाही तो पर्यंत गॅसवर ठेऊन ते उकळवा. तुम्ही हे तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता. यामुळे पांढरी केसं काळी होण्यासोबतच केसांना अनेक फायदे देखील मिळतात.
तिळाच्या तेलात मिसळा आवळा पावडर :
तिळाच्या तेलात आवळा पावडर मिक्स करून केसांमध्ये लावल्याने केसं नैसर्गिकपणे काळी होण्यास मदत होते. यासाठी एका वाटीत तेल घ्या आणि त्यात आवळा पावडर टाका. हे मिश्रण गॅसवर गरम करा आणि 5 मिनिटे त्याला उकळी येऊ द्या. मग तेल थोडे थंड झाले की तुम्ही त्याला बाटलीत स्टोर करुन ठेऊ शकता. यामुळे पांढरी केसं काळी होण्यासोबतच केसांना अनेक फायदे देखील मिळतात.
(सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा केसांवर कोणत्याही गोष्टींचा उपयोग करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
