TRENDING:

Anti-aging Skincare: तारुण्य टिकवायचंय? तिशीच्या आतच सुरु करा अँटी-एजिंग स्किनकेअर, तज्ज्ञांनी दिला 'खास' सल्ला!

Last Updated:

डॉ. मिकी सिंग यांच्या मते, त्वचेचे वृद्धत्व 25 व्या वर्षापासून सुरू होते, ज्यात निस्तेजपणा, पिगमेंटेशन आणि डोळ्याखालील थकवा दिसतो. 30 शी मध्ये बारीक रेषा आणि लवचिकता कमी होते, तर 40 शी मध्ये...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Anti-aging Skincare: कमी वयात वयस्क दिसण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बॉडीक्राफ्ट क्लिनिक्स अँड सलूनच्या संस्थापिका आणि प्रमुख त्वचाशास्त्रज्ञ डॉ. मिक्की सिंग म्हणतात की, त्वचातज्ज्ञ म्हणून आम्ही अनेकदा 20 वर्षांच्या शेवटी असलेल्या रुग्णांनाही त्वचेवर सूक्ष्म बदल दर्शवताना पाहतो: त्वचा निस्तेज दिसणे, हलके पिगमेंटेशन आणि डोळ्यांखाली थकवा जाणवणे. तुमच्या 30 व्या वर्षांपर्यंत, बारीक रेषा-विशेषतः डोळे, तोंड आणि कपाळाभोवती स्थिर होऊ लागतात, तसेच त्वचेची लवचिकता कमी होऊ लागते. तुमच्या 40 व्या वर्षांपर्यंत, अधिक खोल सुरकुत्या, त्वचा सैल पडणे, असमान रंग आणि त्वचेतील व्हॉल्यूम कमी होणे अधिक स्पष्टपणे दिसू लागते.
Anti-aging Skincare
Anti-aging Skincare
advertisement

सामान्य चुका

  • तुमच्या 20 व्या वर्षात, सर्वात मोठी चूक म्हणजे सनस्क्रीनकडे दुर्लक्ष करणे आणि मार्गदर्शनाशिवाय जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह्ह घटकांचा वापर करणे. अनेकजण व्हायरल स्किनकेअर ट्रेंडच्या मागे लागून त्यांच्या त्वचेच्या संरक्षणात्मक आवरणाला नुकसान पोहोचवतात.
  • तुमच्या 30 व्या वर्षात, लोक प्रतिबंधात्मक उपचार टाळतात, कारण त्यांना वाटते की ते क्लिनिकल काळजीसाठी "अजून खूप लहान" आहेत.
  • advertisement

  • तुमच्या 40 व्या वर्षांपर्यंत, अनेकजण केवळ स्किनकेअर उत्पादनांवर अवलंबून राहतात, तर या वयात त्वचेवरीव वयस्कपणाची प्रक्रिया कमी करण्यासाठी खोलवर कोलेजन उत्तेजित करणे आणि व्हॉल्यूम पुनर्संचयित करणे आवश्यक असते.

नियमित दिनक्रमातील बदल

  • 20 वर्षांचे : त्वचेच्या संरक्षणात्मक आवरणाची दुरुस्ती आणि संरक्षणावर लक्ष केंद्रित करा. सौम्य क्लींजर, दररोज ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन (SPF 50) वापरा आणि व्हिटॅमिन सी सारख्या अँटीऑक्सिडंट्सचा समावेश करा.
  • advertisement

  • 30 वर्षांचे : रेटिनॉइड्स (त्वचाशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली), पेप्टाइड सीरम ॲड करा आणि क्लिनिकल फेशियल किंवा माइक्रोनीडलिंगमध्ये गुंतवणूक करा.
  • 40 वर्षांचे : कोलेजन-बूस्टिंग उपचार (रेडिओफ्रिक्वेन्सी, एक्सोसोम्स), कॅफीन किंवा पेप्टाइड्स असलेले आय क्रीम आणि यूरिया, सेरामाइड्स आणि हायलुरोनिक ऍसिड असलेले मॉइश्चरायझर वापरा.

गैरसमज आणि सत्य

  • "तुम्हाला फक्त 40 नंतरच अँटी-एजिंग काळजीची गरज आहे" हे चुकीचे आहे. नुकसान भरून काढण्यापेक्षा प्रतिबंध करणे खूप सोपे आहे.
  • advertisement

  • "महागडी उत्पादने अधिक चांगले काम करतात", याची आवश्यक नाही. किंमतीपेक्षा घटकांची गुणवत्ता आणि सातत्य अधिक महत्त्वाचे आहे.
  • "नैसर्गिक प्राॅडक्ट नेहमीच सुरक्षित असते", अनेक 'नैसर्गिक' उत्पादनांमुळे एलर्जी येऊ शकते किंवा पिगमेंटेशन वाढू शकते.

अँटी-एजिंग योजना प्रतिबंधात्मक, सक्रिय आणि वैयक्तिकृत असावी. त्वचाशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेला दृष्टिकोन, ज्यात क्लिनिकल इंटरव्हेन्शनचा समावेश आहे, दीर्घकाळ त्वचेचे आरोग्य आणि आत्मविश्वास सुनिश्चित करतो.

advertisement

हे ही वाचा : Skin Care : ना ड्राय, ना ऑइली, मग नॉर्मल स्किनची कशी घ्यायची काळजी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1 की 2 नोव्हेंबर, कोणती एकादशी धरायची? तुळशी विवाहाचे दिवस, मुहूर्त आणि महत्त्व
सर्व पहा

हे ही वाचा : मेकअप आर्टिस्टचे सिक्रेट! मेकअप करण्यापूर्वी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स, निस्तेज चेहऱ्यावर येईल ग्लो अन् दिसाल फ्रेश!

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Anti-aging Skincare: तारुण्य टिकवायचंय? तिशीच्या आतच सुरु करा अँटी-एजिंग स्किनकेअर, तज्ज्ञांनी दिला 'खास' सल्ला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल