चॅटजीपीटीने वजन कमी करण्यासाठी कशी केली मदत
वैयक्तिक आहार योजना
वेलनेस एक्स्पर्ट सिमरन वलेचा यांनी सर्वात आधी त्यांनी चॅटजीपीटीला आपली उंची, वजन, वय आणि खाण्याच्या आवडीनिवडीची माहिती दिली. या माहितीच्या आधारे चॅटजीपीटीने त्यांना एक वैयक्तिक आणि संतुलित आहार योजना (Diet Plan) तयार करून दिली. यात कोणत्या वेळी काय खावे आणि त्याचे प्रमाण किती असावे, याचा तपशील होता.
advertisement
व्यायामाची दिनचर्या
केवळ डाएट प्लॅनच नव्हे, तर शरीराच्या गरजेनुसार चॅटजीपीटीने एक व्यायामाची दिनचर्या देखील तयार केली. यात कोणत्या दिवशी कोणते व्यायाम करावे, किती वेळ करावा आणि त्यामागे काय उद्देश आहे, हे स्पष्टपणे सांगितले होते.
कॅलरी ट्रॅकिंग
चॅटजीपीटीने प्रत्येक जेवणातील कॅलरी मोजण्यात मदत केली. यामुळे त्यांना दररोज किती कॅलरीचा वापर करायचा आहे आणि त्यांचे ध्येय गाठण्यासाठी किती कॅलरी कमी कराव्या लागतील, याचा अंदाज आला.
सतत प्रेरणा आणि मार्गदर्शन
जेव्हा वजन कमी करण्याचा प्रवास कठीण वाटतो, तेव्हा चॅटजीपीटीने त्यांना सकारात्मक प्रश्न विचारले आणि प्रेरणा दिली. काही चुकीचे खाल्ल्यास, त्याचे परिणाम आणि पुढील उपाययोजनांबद्दल देखील त्याने मार्गदर्शन केले.
बदलानुसार योजना
वजन जसजसे कमी होत गेले, तसतसे शरीर आणि गरजा बदलतात. चॅटजीपीटीने या बदलांनुसार आहार आणि व्यायामाच्या योजनांमध्ये आवश्यक बदल सुचवले, जेणेकरून प्रगती थांबणार नाही.
वैयक्तिक प्रशिक्षकासारखा अनुभव
एखाद्या मानवी प्रशिक्षकाप्रमाणे, चॅटजीपीटीने प्रत्येक प्रश्नाचे लगेच उत्तर दिले आणि संपूर्ण प्रवासात एक विश्वासार्ह साथीदार म्हणून काम केले. चॅटजीपीटी हे वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी आणि कमी खर्चिक साधन आहे. पण, लक्षात ठेवा की हे कोणत्याही वैद्यकीय तज्ञाला पर्याय नाही. कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)