चिनी कोंबडीची वैशिष्ट्ये
चिनी कोंबडी ही मूळतः चीनमधील ब्रॉयलर प्रकारातील असून तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय वेगाने वाढ होणं आहे. फक्त 35 ते 40 दिवसांत ही कोंबडी बाजारात विक्रीसाठी सज्ज होते आणि साधारण 1.5 ते 2 किलो वजनाची असते. काळसर आणि लाल - पांढऱ्या रंगाची चोच असते. या कोंबडीच्या अंड्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. चिनी कोंबडीमुळे घराच्या जवळ साप, विंचू यासारखे विषारी प्राणी येत नाही. छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरील झाल्टा फाटा येथे सुरेश तोंडकर हे चिनी कोंबडी विक्री करतात.
advertisement
चिनी कोंबडीने अंडी देण्यास सुरुवात केल्यानंतर सारखी नऊ महिने दररोज एक अंड देते. या कोंबडीची जोडी साधारणपणे 1500 ते 1600 रुपयांपर्यंत मिळते. अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असून त्यामुळे सर्दी, खोकला, दमा अशा आजारांवर मात केली जाते, असे चिनी कोंबडी विक्रेते तोंडकर यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले.
गावरान कोंबडीला जिथे 5 ते 6 महिने लागतात, तिथे चिनी कोंबडी दीड महिन्यात तयार होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती 'कॅश काऊ' ठरते. 1990–95 च्या दशकात भारतात चिनी कोंबडीची एन्ट्री झाली आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांतून ती देशभर पसरली. कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारी ही कोंबडी पोल्ट्री उद्योगाच्या वेगवान वाढीमागचं प्रमुख कारण ठरली. मात्र, तिची रोगप्रतिकारकता देशी कोंबडीपेक्षा कमी असल्याने योग्य लसीकरण आणि शास्त्रीय पद्धतीने निगा राखणं अत्यावश्यक आहे.
दरम्यान, चिनी कोंबडीच्या वैशिष्ट्यांमुळे ती सध्याच्या काळात भारतातील पोल्ट्री उद्योगाचं बळ आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग ठरत आहे.