उरलेल्या फराळापासून भन्नाट अशी रेसिपी. ज्याचा व्हिडीओ एका महिलेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. फराळापासून असा पदार्थ की कुणाला कळणारही नाही की यात फराळ टाकला आहे. विशेष म्हणजे फराळापासून बनवलेला हा पदार्थ पौष्टीकही आहे. हा पदार्थ बनवण्यसाठी तुम्हाला दिवाळी फराळासोबत आणी काही जिन्नस लागणार आहेत. ते कोणतं पाहुयात.
advertisement
साहित्य
1 वाटी किसलेला दुधी
2 वाटी गहू पीठ
1 टिस्पून बेसन
1 टेबल स्पून मिरची पावडर
1 टिस्पून धना पावडर
पाव चमचा हळद
चिमूटभर हिंग
मीठ चवीनुसार
1 चमचा तीळ
1 चमचा ओवा
कसुरी मेथी
कोथिंबीर
तेल/तूप
कृती
सगळ्यात आधी सर्व फराळ एकत्र करून मिक्सरमधून त्याची पूड करून घ्या. व्हिडीओमध्ये महिलेने चकली, शंकरपाळी, शेव, खाऱ्या पुऱ्या, लाडू, मक्याचा चिवडा असे सगळे पदार्थ घेतलेले दिसतात.
आता एका भांड्यात दुधी किसून घ्या. त्यात गव्हाचं पीठ, बेसन, मिरची पावडर, धने पावडर, हिंग, मीठ, ओवा, तीळ, कसुरी मेथी, कोथिंबीर, थोडं तेल टाकून सगळं मिक्स करा. यात पाणी टाकून पीठ नीट मळून घ्या. पाणी टाकताना हळूहळूच टाका कारण दुधीला पाणी सुटतं.
Guava : सुपरफ्रुट आहे पेरू पण 4 लोकांसाठी ठरू शकतो डेंजर; चुकूनही खाऊ नका
आता या पीठाचे गोळे करा. पीठ आणि तेल लावून लाटून घ्या. त्यात फराळाचा तयार केलेला मसाला टाका आणि पुन्हा गोळा करून लाटून घ्या. त्यावर कोथिंबीर टाका. तव्यावर टाकून बाजूने तेल किंवा तूप सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. हा तुमचा फराळाचा पौष्टिक असा पराठा तयार झाला.
@rashmishah8833 युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही रेसिपी करून पाहा आणि हा पराठा कसा लागला? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फराळापासून आणखी काय बनवता येईल, तुम्ही उरलेल्या फराळाचं काय करता, कोणती रेसिपी बनवता, तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
