Guava : सुपरफ्रुट आहे पेरू पण 4 लोकांसाठी ठरू शकतो डेंजर; चुकूनही खाऊ नका
- Published by:Priya Lad
Last Updated:
Guava Can Be Harmful : पेरू प्रत्येकासाठी चांगला नाही. विशेषतः काही आरोग्य समस्या असलेल्यांसाठी त्याचा फायदा काहीच नाही पण नुकसान होईल. पेरू कोणी खाऊ नये हे जाणून घेऊया.
 पेरू हे एक सुपरफ्रूट आहे जे हिवाळ्यात शरीराला अनेक फायदे देतं. अतिशय कमी किमतीत सर्वांना सहज उपलब्ध होणाऱ्या या फळात व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. पण पेरू प्रत्येकासाठी चांगला नाही. विशेषतः काही आरोग्य समस्या असलेल्यांसाठी त्याचा फायदा काहीच नाही पण नुकसान होईल. पेरू कोणी खाऊ नये हे जाणून घेऊया.
advertisement
 पोटाचा त्रास असलेले : पेरूमध्ये नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज) आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. यामुळे ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांना पोट फुगणे, गॅस अशा समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही आतड्यात व्हिटॅमिन सी आणि फ्रुक्टोजची पातळी जास्त असताना पेरू खाल्ले तर आतड्यांमध्ये किण्वन प्रक्रिया होते. यामुळे पोटात अस्वस्थता येते आणि गॅस बाहेर पडतो. अशा लोकांनी झोपण्यापूर्वी पेरू खाऊ नये. जेवणासोबत किंवा थोडा थोडा खाल्ल्याने अस्वस्थता कमी होईल.
advertisement
 डायबेटिज रुग्ण : पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो, जो रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ दर्शवतो. ते रक्तप्रवाहात हळूहळू साखर सोडतं. म्हणूनच मधुमेहाचे रुग्ण ते खाऊ शकतात. पण जर इन्सुलिन घेणाऱ्यांनी पेरू जास्त  खाल्ले तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल आणि आजाराची तीव्रता वाढेल. म्हणून दररोज 1-2 पेक्षा जास्त पेरू खाऊ नका. ग्लुकोजचं शोषण कमी करण्यासाठी ते प्रथिने आणि इतर चरबीयुक्त पदार्थांसह खाऊ नयेत.
advertisement
 इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) : पेरूमध्ये विरघळणारे आणि अघुलनशील फायबर भरपूर प्रमाणात असते. ते पचन करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता कमी करतं. पण IBS किंवा अशा इतर समस्या असलेल्या लोकांनी पेरू खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो. जसं आतड्यांची क्रिया वाढते, पोटात पेटके, अतिसार किंवा बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि गॅस होतो. अशा लोकांनी पेरू कमी प्रमाणात खावा. ते थेट खाण्याऐवजी स्मूदी बनवल्याने पोटातील जळजळीचा त्रास कमी होईल.
advertisement


