advertisement

Thane: ठाण्यात जमिनीखालून येतोय मोठा आवाज, लोकांमध्ये भीतीचं वातावरण, कारण समोर!

Last Updated:

ठाणेकरांना गेल्या काही दिवसांपासून हादरे बसत आहेत. सतत बसणाऱ्या हादऱ्यांमुळे ठाणे आणि मुलुंडकरांना त्रस्त झाले आहेत.

Thane: ठाण्यात जमिनीखालून येतोय मोठा आवाज, लोकांमध्ये भीतीचं वातावरण, कारण समोर!
Thane: ठाण्यात जमिनीखालून येतोय मोठा आवाज, लोकांमध्ये भीतीचं वातावरण, कारण समोर!
ठाणे: ठाणेकरांसाठी महत्त्वासाठी बातमी आहे. ठाणेकरांना गेल्या काही दिवसांपासून हादरे बसत आहेत. भुकंपामुळे नाही तर, सुरुंग स्फोटामुळे ठाणे आणि मुलुंडकरांना हादरे बसत आहेत. सतत बसणाऱ्या हादऱ्यांमुळे ठाणेकर त्रस्त झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या सुरूंग स्फोटाचा फार त्रास सहन करावा लागत आहे. खरंतर जलबोगद्यासाठी हे काम सुरू आहे. भिवंडीतल्या कशेळी गावापासून ते मुलुंड जकात नाक्यापर्यंत पाणी वहनासाठी जलबोगद्याचे काम सुरू आहे. भुसुरुंग स्फोटामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
मुलुंडमधील हरि ओम नगरातील रहिवाश्यांना या भुसुरूंगाची चांगलीच डोकेदुखी झाली आहे. ठाणे आणि मुलुंडमधील काही ठिकाणामध्ये भुयारी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे भुसुरूंग केला जात आहे. या भुसुरूंगामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जलवाहिनीच्या कामामुळे तिथल्या परिसरातील नागरिकांना भुकंपसदृष्य हादरे बसत आहेत. मोठा आवाज आणि हादऱ्यांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना फार त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दलची तक्रार स्थानिकांनी मुंबई महानगर पालिकेकडे करण्यात आली आहे.
advertisement
हरि ओम नगरातील रहिवाश्यांनी लवकरात लवकर या प्रकरणावर डगा काढण्याची मागणी बीएमसीकडे केली. 7.1 किमी अंतराची भिवंडीतल्या कशेळी गावापासून ते मुलुंड जकात नाक्यापर्यंत पाणी वहनासाठी जलबोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारित या जलबोगद्याचे खोदकाम केले जात आहे. जलबोगद्यांचे बांधकाम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. जलबोगद्यांच्या माध्यमातून पाणीवहन केल्यामुळे पाणीगळती आणि पाणी वितरणातील अपव्यय टाळता यावे यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane: ठाण्यात जमिनीखालून येतोय मोठा आवाज, लोकांमध्ये भीतीचं वातावरण, कारण समोर!
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement