advertisement

पुणेकरांनो लक्ष द्या! पुणे पोलिसांची महत्त्वाची 'मोहिम', हा रस्ता राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Last Updated:

नागरिकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

News18
News18
पुणे: राज्य पोलिस दलात 15,300 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती प्रक्रिया 11 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. भरती प्रक्रियेमुळे पुण्यातील काही ठिकाणी वाहतुकीवर बदल करण्यात आले आहेत. विशेषतः पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय, पाषाण येथील अंतर्गत रस्ते 17 फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाषाण येथील अंतर्गतरस्ते 17 फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीस बंद
पुणे शहरात सध्या पोलिस भरती प्रक्रिया सुरू असून, त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय पाषाण येथील काही अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या अंतर्गत रस्त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत दररोज पहाटे 4 वाजता ते सायंकाळी 6 वाजता वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिमंत जाधव यांनी केले आहे.
advertisement
पर्यायी मार्ग कोणते?
पुण्यातील पाषाण रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयापासून पुरंदर हॉल, बाणेर रोडपर्यंत तसेच पाषाण रोडवरील पेट्रोलपंपापासून बाणेर रोडवरील पेट्रोलपंपपर्यंत काही काळ वाहतुकीवर बंदी राहणार आहे. या बंदीमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी प्रवासाची पूर्वतयारी करून सुरक्षित मार्गाचा वापर करणे गरजेचे आहे. या काळात पुणे विद्यापीठ चौक मार्गे हा पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो लक्ष द्या! पुणे पोलिसांची महत्त्वाची 'मोहिम', हा रस्ता राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement