advertisement

No Spend Challenge : नो स्पेंड चॅलेंजची का होतेय चर्चा, काय आहे No spend day, No spend week challenge चं महत्त्व

Last Updated:

काही काळासाठी पैसे खर्च न करणं त्याचबरोबर आजूबाजूच्या घटनांबद्दल जागरूक राहण्याच्या दृष्टीनं आणि खर्च करण्याच्या वृत्तीला आळा बसावा असा या ट्रेंडचा उद्देश आहे. या ट्रेंडला पसंती मिळतेय. No spend day, No spend weekend, No pantry challenge असे अनेक प्रकार यामधे आहेत. 

News18
News18
मुंबई : नवीन वर्ष सुरू झालंय, फेब्रुरूवारी महिनाही सुरू झालाय पण अजूनही तुम्ही कोणताही संकल्प केला नसेल तर एक संकल्प मात्र नक्की करू शकता. तो म्हणजे नो स्पेंड चॅलेंज. हे चॅलेंज नेमकं काय समजून घेऊयात.
या वर्षाच्या म्हणजे 2026 च्या सुरुवातीपासूनच हा ट्रेंड सुरू आहे. वायफळ खर्च न करता काय गरजेचं आहे तेवढ्यापुरताच खर्च करणं आणि आर्थिक शिस्त आणणं हे या वर्षाचं उद्दिष्ट ठेवा असा यामागचा उद्देश आहे.
काही काळासाठी पैसे खर्च न करणं त्याचबरोबर आजूबाजूच्या घटनांबद्दल जागरूक राहण्याच्या दृष्टीनं आणि खर्च करण्याच्या वृत्तीला आळा बसावा असा या ट्रेंडचा उद्देश आहे. या ट्रेंडला पसंती मिळतेय. No spend day, No spend weekend, No pantry challenge असे अनेक प्रकार यामधे आहेत.
advertisement
No spend day
- घरात उपलब्ध असलेले पदार्थ खाणं
- ऑनलाइन शॉपिंग टाळणं
- सहज वाटलं म्हणून शॉपिंग न करणं.
यामुळे मेंदूला वाटेल तसा खर्च न करण्यापासून रोखण्याचे सवय लावणं, नियंत्रण करणं अपेक्षित आहे.
No spend weekend
- वीकेंड शॉपिंग न करणं.
advertisement
- त्याऐवजी फिरणं, व्यायाम करणं आणि घरी टीव्ही बघण्याला प्राधान्य देणं.
- वाचन करणं वर्तमानपत्र वाचणं घरातील अनावश्यक गोष्टी टाकून देणं.
- सोशल टाईम म्हणजेच भेटीगाठी, गप्पा टप्पा करणं पण यासाठी कुठल्याही रेस्टॉरंटला जाणं टाळणं.
- थोडक्यात पैसे खर्च न करता हे करणं शक्य आहे याची जाणीव होणं.
No pantry challenge
advertisement
- आठ ते पंधरा दिवस घरातील उपलब्ध साहित्यातूनच जेवण बनवणं.
- घरातील उपलब्ध साहित्य आणि फ्रिजमधे ठेवलेल्या धान्यापासून पदार्थ तयार करणं
- अर्ध उरलेलं किंवा बांधून ठेवलेले जिन्नस अन्नपदार्थांसाठी आधी संपवणं.
- अन्न वाया न घालवणं म्हणजेच नो फूड वेस्ट.
- त्यामुळे महिनाभराचा बराच खर्च वाचतो.
advertisement
Cut one category
- यामध्ये कुठलीही एक गोष्ट महिनाभर खरेदी न करण्याची सवय करणं.
- उदाहरणार्थ बाहेर कॉफी प्यायला न जाणं
- पार्लरला जाणं टाळावं.
- ऑनलाइन शॉपिंग करणं
- या सवयींमुळे पैसे खर्च करण्याची वृत्ती कमी होते, या गोष्टींची गरज नव्हती पण त्या सवयीचा भाग झाल्या होत्या हे लक्षात येतं.
advertisement
Cash only week
- आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पैशातूनच म्हणजेच नगद किंवा रोकडीतूनच खरेदी करणं.
- पैशांसाठी एटीएमचा वापर टाळणं.
- UPI चा वापरही टाळणं.
- हातात उपलब्ध असलेल्या पैशांचा वापर करावा लागत असल्यामुळे खर्चावर आपोआप नियंत्रण येतं. यातल्या आणखी ट्रेंडविषयीही लवकरच माहिती करुन घेऊयात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
No Spend Challenge : नो स्पेंड चॅलेंजची का होतेय चर्चा, काय आहे No spend day, No spend week challenge चं महत्त्व
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement