advertisement

चार्टर्ड अकाउंटंट तरुणीने 28 लाखांची नोकरी सोडली, घेतली सर्वात मोठी ‘रिस्क’; धाडसी निर्णयानंतर जे काही घडलं अविश्वसनीय

Last Updated:

CA Quit Job: बेंगळुरूच्या चार्टर्ड अकाउंटंट मीनल गोयल यांनी 28 लाखांच्या स्थिर पगाराची नोकरी सोडून फ्रीलान्सिंगचा अनिश्चित मार्ग स्वीकारला. त्यांच्या या निर्णयामुळे करिअर, जोखीम आणि वाढ यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

News18
News18
बेंगळुरू: उच्च पगाराची नोकरी म्हणजे सुरक्षित भविष्य, असा समज अनेकांचा असतो. पण हीच सुरक्षितता करिअरच्या वाढीला मर्यादा घालत असेल तर? बेंगळुरूमधील चार्टर्ड अकाउंटंट मीनल गोयल यांनी याच प्रश्नासमोर उभे राहून धाडसी निर्णय घेतला. वर्षाला 28 लाख रुपयांच्या स्थिर पगाराची नोकरी सोडून फ्रीलान्सिंगचा मार्ग स्वीकारला.
‘पगार वेळेवर, पण वाढ मर्यादित’
KPMG आणि Deloitteसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेल्या मीनल यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये आपला अनुभव मांडला. “28 LPA ची नोकरी का सोडली? पगार वेळेवर मिळत होता, सगळं ठरलेलं होतं. पण वाढीला एक छत होतं. कितीही मेहनत केली तरी परिणाम नेहमी बदलत नव्हते,” असे त्यांनी लिहिले. त्यांच्या मते, कॉर्पोरेट नोकरीत आर्थिक स्थिरता आणि ठरलेली दिनचर्या होती; मात्र व्यावसायिक प्रगती ठरावीक मर्यादेपर्यंतच होती.
advertisement
अनिश्चितता पण संधी अमर्याद
नोकरी सोडून फ्रीलान्सिंगकडे वळणे म्हणजे हमखास पगाराच्या बदल्यात अनिश्चित उत्पन्न स्वीकारणे. “काही महिने चांगले गेले, काही महिन्यांत उत्पन्नच नव्हते. पण वाढ ठरलेली राहिली नाही. सर्वात मोठा बदल पैशात नव्हता, तर मालकीभाव आणि जबाबदारीत होता,” असे मीनल म्हणाल्या.
त्यांच्या मते, फ्रीलान्सिंगने त्यांना शिकण्याची सवय, लवचिकता आणि कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता दिली. प्रत्येक क्लायंट, प्रत्येक प्रोजेक्ट स्वतः शोधावा लागतो, परिणामांची जबाबदारी स्वतः घ्यावी लागते आणि हीच खरी परीक्षा असते.
advertisement
‘सुरक्षितता की संधी?’
मीनल यांनी स्पष्ट केले की स्थिर नोकरी आणि फ्रीलान्सिंग यापैकी कोणताही मार्ग चुकीचा किंवा बरोबर नाही. “स्थिर नोकरी निश्चितता देते. फ्रीलान्सिंग शिकायला भाग पाडते. प्रश्न एवढाच आहे. वाढीसाठी तुम्ही किती अनिश्चितता स्वीकारू शकता?” असे त्यांनी लिहिले.
सोशल मीडियावर चर्चा रंगली
त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, “हा नोकरी सोडण्याचा मुद्दा नाही, तर रिस्क घेण्याची क्षमता समजून घेण्याचा आहे. काहींना निश्चिततेत झोप लागते, तर काहींना मालकीभावात.”
advertisement
दुसऱ्याने लिहिले, “जोखीम न घेतल्यास आपली खरी क्षमता कधीच कळत नाही.” काहींनी आरामदायी आयुष्य कधी कधी ‘अदृश्य पिंजरा’ ठरू शकतो, असेही नमूद केले. तर एका वाचकाने लिहिले, “मोठे परिणाम बहुतेक वेळा कम्फर्ट झोनच्या बाहेरच मिळतात. पण जोखीम म्हणजे बेफिकीरपणा नाही; ती विचारपूर्वक आणि सजग असावी लागते.”
करिअर निवडीचा मोठा प्रश्न
मीनल यांच्या निर्णयाने एक मोठी चर्चा सुरू केली आहे ती म्हणजे, स्थिर उत्पन्न की अमर्याद वाढ? आजच्या काळात करिअर म्हणजे केवळ पगाराचा आकडा नसून शिकण्याची क्षमता, स्वतःची जबाबदारी आणि दीर्घकालीन उद्दिष्टे यांचाही विचार करावा लागतो.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
चार्टर्ड अकाउंटंट तरुणीने 28 लाखांची नोकरी सोडली, घेतली सर्वात मोठी ‘रिस्क’; धाडसी निर्णयानंतर जे काही घडलं अविश्वसनीय
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement