डॉक्टर पावन यांच्यामते, जर तुम्ही मुलांना गहू नाही तर एका विशेष धान्यापासून बनवलेली चपाती खाऊ घातली तर ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी हे धान्य अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया डॉक्टर कोणत्या धान्यविषयी बोलत आहेत.
मुलांच्या आरोग्यासाठी हे धान्य सर्वोत्तम..
गव्हाची चपाती : डॉक्टर म्हणतात की, रँकिंगच्या बाबतीत गव्हाची चपाती चौथ्या क्रमांकावर आहे. ही चपाती सर्वात जास्त खाल्ली जाते. परंतु पोषक तत्वांच्या बाबतीत ही चपाती मागे आहे. गव्हाच्या चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे मुलांना दिवसभर ऊर्जा देतात. परंतु प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचे प्रमाण कमी असते. गव्हात ग्लूटेन असते, जे काही मुलांना ग्लूटेन संवेदनशील बनवते. वजन वाढवण्याच्या आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याच्या बाबतीत हे पीठ इतरांमध्ये शेवटचे आहे.
advertisement
ज्वारीची भाकरी : ज्वारीची भाकरी तिसऱ्या क्रमांकावर येते. ज्वारीच्या पिठात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्वारीमध्ये व्हिटॅमिन बी आणि मॅग्नेशियम असते, जे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते.
बाजरीची भाकरी : बाजरीची भाकरी दुसऱ्या क्रमांकावर येते. बाजरीची भाकरी मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. वजन वाढवण्यासाठी हे सर्वोत्तम आहे. बाजरीच्या भाकरीमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि जस्त असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यामुळे मुलांचे पोट दिवसभर भरलेले राहते.
नाचणीची भाकरी : नाचणीची भाकरी पहिल्या क्रमांकावर आहे. नाचणी मुलांसाठी सर्वोत्तम आहे. नाचणीमध्ये दुधापेक्षा चार पट जास्त कॅल्शियम असते, जे मुलांच्या हाडे आणि दातांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. नाचणीमध्ये भरपूर लोह असते, जे मुलांना अशक्तपणापासून दूर ठेवते.
या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
