कांद्याचे दर स्थिर तर तुरीच्या दरात पुन्हा झाली घट, सोयाबीनला किती मिळाला भाव? Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
24 जानेवारी शनिवार रोजी राज्यातील कृषी बाजारांत महत्वाच्या पिकांच्या दरांमध्ये मिश्र चित्र पाहायला मिळालं. कपाशी आणि सोयाबीनच्या दरात किंचित वाढ नोंदवली गेली असून कांद्याचे दर आजही स्थिर राहिले आहेत.
अमरावती : 24 जानेवारी, शनिवार रोजी राज्यातील कृषी बाजारांत महत्त्वाच्या पिकांच्या दरांमध्ये मिश्र चित्र पाहायला मिळालं. कपाशी आणि सोयाबीनच्या दरात किंचित वाढ नोंदवली गेली असून, कांद्याचे दर आजही स्थिर राहिले आहेत. मात्र, तुरीच्या दरात घट झाल्याचं चित्र आहे. पाहुयात, आज प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला.
कपाशीच्या दरात किंचित वाढ
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या अहवालानुसार, आज राज्यातील विविध कृषी बाजार समित्यांमध्ये कपाशीची एकूण 11 हजार 325 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. यामध्ये वर्धा बाजारात सर्वाधिक 5 हजार 500 क्विंटल कपाशीची आवक झाली. त्याठिकाणी कपाशीला किमान 7 हजार 710 तर कमाल 8 हजार 335 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक दर मिळाला. शुक्रवारी नोंदवलेल्या दरांच्या तुलनेत आज कपाशीच्या सर्वाधिक बाजारभावात किंचित वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
कांद्याचे दर आजही स्थिर
आज राज्यातील कृषी बाजारांत एकूण 2 लाख 23 हजार 589 क्विंटल कांद्याची आवक झाली. यापैकी सोलापूर बाजारात 83 हजार 633 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नोंदवली गेली. या बाजारात कांद्याला किमान 100 ते कमाल 2 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. अमरावती आणि चंद्रपूर बाजारात आवक झालेल्या कांद्याला 2 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाल्याचे दिसून आले. शुक्रवारी मिळालेला उच्चांकी दर आजही स्थिर आहे.
advertisement
सोयाबीनच्या दरात वाढ
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये सोयाबीनची एकूण 31 हजार 300 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये अकोला बाजारात 6 हजार 071 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. अकोला बाजारात सोयाबीनला किमान 4 हजार 765 ते कमाल 5 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पिवळ्या सोयाबीनला वाशिम बाजारातच 6 हजार 320 रुपये प्रतिक्विंटल असा उच्च दर मिळाला. शुक्रवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या भावात वाढ नोंदवण्यात आली आहे.
advertisement
तुरीच्या दरात घट
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये तुरीची एकूण 23 हजार 354 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये जालना बाजारात 10 हजार 036 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक झाली. त्या ठिकाणी तुरीला किमान 6 हजार 300 ते कमाल 7 हजार 338 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. जालना बाजारात आलेल्या काळ्या तुरीला 8 हजार 602 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा उच्चांकी दर मिळाला. शुक्रवारी नोंदवलेल्या दरांच्या तुलनेत आज तुरीच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे.
advertisement
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 8:56 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
कांद्याचे दर स्थिर तर तुरीच्या दरात पुन्हा झाली घट, सोयाबीनला किती मिळाला भाव? Video








