Thane Crime: 'वर्क फ्रॉम होम'च्या अमिषाला भुलला, त्रिकुटाने आठ लाखांची फसवणूक केली
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Thane Crime: इन्स्टाग्रामवर स्क्रोलिंग करत असताना एका महिला नोकरीच्या अमिषात लाखो रूपये गमावून बसलीये.
सोशल मीडियासह सर्वत्रच आपल्याला नोकरीच्या संधी असणाऱ्या जाहीरात पाहायला मिळतात. त्यापैकी अनेक जाहीरात खोट्या राहतात तर त्यापैकी काही जाहीराती खऱ्या असतात. इन्स्टाग्रामवर स्क्रोलिंग करत असताना एका महिला नोकरीच्या अमिषात लाखो रूपये गमावून बसलीये. हा सर्व प्रकार ठाण्यामध्ये घडला आहे. ठाण्यामध्ये एक महिला नोकरीच्या शोधात होती. सहज सोशल मीडियावर नोकरीची संधी शोधत असताना तिने लाखो रूपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा सायबर पोलिसांकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
'वर्क फ्रॉम होम'च्या नावाखाली ऑनलाईन गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका महिलेची आठ लाखांची फसवणूक झाल्यांचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, 1 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत त्यांच्या मोबाईलवर इन्स्टाग्रामवर 'वर्क फ्रॉम होम'साठीची एक जाहिरात दिसली होती. त्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॲपवर शिलपीता नावाच्या एका अनोळखी महिलेचा मेसेज आला होता. त्यानंतर तिने टेलिग्रामची लिंक देत तिथे कनेक्ट होण्याचा सल्ला दिला.
advertisement
शिलपिताने सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीने तशी प्रोसेस फॉलो केली. त्यांनंतर तक्रारदारला सायली कांबळे आणि विक्रम सिंगट नावाच्या टेलिग्राम अकाऊंटसोबत कनेक्ट होण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती व्यक्ती कनेक्ट झाली सुद्धा. सायली- विक्रम या दोघांनी वेगवेगळ्या हॉटेल्सचे रिव्ह्यू देणे आणि शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली काम देण्यास सुरुवात केली. गुंतवणुकीसाठी एक लिंक तक्रारदार यांना पाठविली. या वेबसाइटवर गुंतवणूक केल्यानंतर तक्रारदाराला नफा होत असल्याचे दाखवले. नफ्याला भुलून तक्रारदाराने आठ लाख रूपयांची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक करणंच त्या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 8:54 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Crime: 'वर्क फ्रॉम होम'च्या अमिषाला भुलला, त्रिकुटाने आठ लाखांची फसवणूक केली









