'भारतीय हिंदूंनी बनवलेली फिल्म...', Netflix वर गाजतेय बॉलिवूडची अंडररेटेड फिल्म, पाकिस्तानात टॉप ट्रेंडिंग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कितीही तणावाचे असले, तरी काही चित्रपट मात्र सीमा ओलांडून आपलं काम चोख बजावतात. सध्या असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय.
advertisement
एकीकडे अक्षय खन्ना, रणवीर सिंह आणि संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेल्या 'धुरंधर' या चित्रपटाला दहशतवादाच्या पार्श्वभूमीमुळे पाकिस्तान आणि आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण त्याच वेळी, त्याच दिग्दर्शकाची म्हणजेच आदित्य धरची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतम हिच्या एका चित्रपटाने मात्र पाकिस्तानच्या घराघरांत जागा मिळवली आहे. तो चित्रपट म्हणजे 'हक' (Haq).
advertisement
सुपर्ण वर्मा दिग्दर्शित 'हक' हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये आला, तेव्हा त्याला फारसं यश मिळालं नाही. मात्र, नेटफ्लिक्सवर येताच या चित्रपटाने जणू जादू केली. भारतात आलिया भट्ट आणि करण जोहरसारख्या सेलेब्सनीही या चित्रपटाचं कौतुक केलंच, पण आश्चर्याची बाब म्हणजे नेटफ्लिक्स पाकिस्तानमध्ये हा चित्रपट सध्या टॉप ट्रेंडमध्ये आहे.
advertisement
advertisement
पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या फाजिला काजी यांनी 'हक' पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त केली. त्या म्हणतात, "या चित्रपटातील इमोशनल खोली काळजाला भिडणारी आहे. या सिनेमाने मला रडवलं! यामी गौतम, तुझा अभिनय अप्रतिम होता." केवळ फाजिलाच नाहीत, तर इतरही अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटी या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत.
advertisement
पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री मरयम नूर हिने तर चक्क आपल्याच इंडस्ट्रीचे वाभाडे काढले आहेत. 'हक'चं कौतुक करताना तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं, "हक हा चित्रपट भारतीय हिंदूंनी बनवला आहे, पण तरीही आपल्या पाकिस्तानी ड्रामाच्या तुलनेत त्यांनी कुराण, कुटुंब व्यवस्था आणि तलाक या विषयांवर योग्य प्रकाश टाकला आहे. आपली इंडस्ट्री अजूनही तलाक देण्याची चुकीची पद्धत दाखवून लोकांना भरकटवते. त्यांनी जे वर्षांपूर्वी शिकून घेतलं, ते आपण अजूनही का स्वीकारत नाही? प्रत्येक कपलने हा चित्रपट पाहायलाच हवा."
advertisement
'हक' हा चित्रपट केवळ एक मनोरंजन नसून, तो पुर्वापार चालत आलेल्या सामाजिक रुढी आणि महिलांच्या हक्कांना हात घालतो. यामी गौतमने यामध्ये एका अशा स्त्रीची भूमिका साकारली आहे, जी आपल्या हक्कांसाठी व्यवस्थेशी दोन हात करते. यातील कौटुंबिक मूल्यं आणि धर्माची दिलेली शिकवण या गोष्टी पाकिस्तानी प्रेक्षकांना जास्त जवळच्या वाटत आहेत.









