नाटकाच्या निमित्तानं भेट अन् 18 वर्षांचा सुखी संसार; नाशिकची अनिता दाते कशी झाली पुण्याची सून
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Anita Date Love Story : अभिनेत्री अनिता दाते गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम करतेय.एकीकडे काम दुसरीकडे तिचा 18 वर्षांचा सुखी संसार आहे. अनिता दातेची लव्ह स्टोरी माहितीये का?
'माझ्या नवऱ्याची बायको', 'नवा गडी नवं राज्य', 'इंद्रायणी' सारख्या सुपरहीट मालिका तसंच 'वाळवी', 'तुंबाड', 'जोगवा', 'जारण', 'मी वसंतराव' सारख्या दमदार सिनेमांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. अनिताने आपल्या कामातून प्रेक्षकांची मनं जिंकली. पण अनिताचं मन जिंकणारा अवलिया तुम्हाला माहितीये का? अनिता दातेचा 18 वर्षांचा सुखी संसार सुरू आहे. नाशिकची अनिता पुण्याची सून आहे.
advertisement
अनिताने चिन्मय केळकरबरोबर लग्न केलं. चिन्मय समुपदेशक, दिग्दर्शक आणि अभिनेता देखील आहे. दोघांची पहिली ओळख पुण्याच्या ललित कला केंद्रात झाली. दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना चिन्मयने दोघांची लव्ह स्टोरी सांगितली तो म्हणाला, "मी ललित केंद्रातून पास झाल्यानंतर ललित केंद्रात भेट व्हायची. ती तेव्हा तिथे होती. ती मला दिसली नाही."
advertisement
"तिने 'मेड्स' नावाचं नाटक बसवलं होतं. ते तिने मला ऐकायला बोलावलं. नंतर मी पाहायला गेलो. तिचं दिग्दर्शन, लेखन, नाटक निवडण्यामागची भूमिका हे पाहून मी थक्क झालो. तेव्हा ती आतापेक्षा निम्मीही कॉन्फिडन्ट दिसायची नाही. ही बोलायला उत्सुक नाही असं वाटायचं. मी तिला थक्क होऊन सांगितलं की हे सगळं खूप भारी झालं."
advertisement
advertisement
advertisement
"तो कसाही वागला तरी त्यांना तो जवळचा वाटायचा. तो खूप वाचायचा, अनुभव गोळा करणारा मुलगा आहे. त्याने सांगितलं की तशीच्या तशी ती गोष्ट समोर उभी राहते. प्रत्येकाशी बोलताना त्याचा अप्रोच ग्रहण करणारा असायचा. तो सगळं वेचणारा होता त्यामुळे तो आपल्या आसपास असावा, जवळ असावा असं वाटलं. आणि आम्ही प्रेमात पडलो."
advertisement
अनिता पुढे म्हणाली, "माझ्या घरी चिन्मय आवडला. मी निर्णय घेतला असेल तर त्यासोबत घरातील माणसं असतात. माझ्यामध्ये हा कॉन्फिडन्स होता की तुमच्यावर जबाबदारी नाही. माझ्या निर्णयाची जबाबदारी माझी. चिन्मय स्वतः भेटायला आला होता. त्यांना असं वाटलं की हा मुलगा योग्य आहे, विचारांनी स्वच्छ आहे. या क्षेत्रातील आहे त्यामुळे त्यांनी होकार दिला, त्यांना तो पसंत पडला."
advertisement









