TRENDING:

रात्री जास्त का रडतात न्यूबॉर्न बेबी? काय आहे कारण?

Last Updated:

लहान मुलांच्या झोपेचं गणित पूर्णपणे वेगळं असतं. ती दिवसभर झोपतात; पण रात्र होताच ती उठतात. इतकंच नाही, तर जागं राहून मुलं वारंवार रडत असतात. नवजात बालकं बहुतांश रात्री जागरण करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : लहान मुलांच्या झोपेचं गणित पूर्णपणे वेगळं असतं. ती दिवसभर झोपतात; पण रात्र होताच ती उठतात. इतकंच नाही, तर जागं राहून मुलं वारंवार रडत असतात. नवजात बालकं बहुतांश रात्री जागरण करतात. ही बाब बऱ्याच मुलांमध्ये आढळते आणि ते नॉर्मल मानलं जातं; पण कित्येक वेळा काही त्रासामुळेसुद्धा लहान मुलं रडतात. बालरोगतज्ज्ञांच्या मते, नवजात बालकांच्या झोपेचं चक्र हे मोठ्या माणसांच्या तुलनेत भिन्न असतं. ही मुलं रात्री जागतात आणि दिवसा आरामात झोप काढतात. चला तर, या पाठीमागे असलेलं मजेशीर कारण सविस्तर जाणून घेऊ या.
रात्री जास्त का रडतात न्यूबॉर्न बेबी? काय आहे कारण?
रात्री जास्त का रडतात न्यूबॉर्न बेबी? काय आहे कारण?
advertisement

दिल्लीच्या फोर्टिस हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ आणि नियोनॅटोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अवधेश आहुजा यांच्या मते, रात्री जागरण करणं आणि दिवसा झोपणं हे नवजात बालकांचं झोपेचं चक्र असतं. गर्भारपणाच्या काळात जेव्हा आई दिवसा चालत असते तेव्हा पोटातल्या बाळाला झोका मिळतो आणि बाळ आरामात झोपून जातं. नवजात बालकांच्या बाबतीत असंच काहीसं घडतं. तसं पाहिलं तर लहान मुलांचं रडणं ही अगदी सामान्य बाब आहे; पण रात्रीच्या वेळी मूल जास्त रडलं तर याचं कारण पोटदुखी आणि वात (गॅस) हे असू शकतं. रात्रीच्या वेळी नवजात बालकांच्या पोटात जास्त दुखतं आणि वात तयार होतो. सामान्यपणे याच कारणामुळं मुलं जास्त रडतात.

advertisement

Coconut Water : तुम्हीही या पद्धतीनं नारळ पाणी पिता का? मग फायद्याऐवजी होईल नुकसान

डॉक्टरांच्या मते, नवजात बाळं रात्री लघवी केल्यानंतर अंथरूण ओलं झाल्यामुळेसुद्धा रडतात. अशा वेळी रात्री सतत त्यांचा डायपर तपासला पाहिजे आणि गरज असल्यास तो बदलला पाहिजे. बाळाला भूक लागते, तेव्हासुद्धा ते रडू लागतं. अशा परिस्थितीत रात्रभरातही थोड्या थोड्या वेळानं बाळाला दूध पाजावं. बाळांना जन्मानंतर 6 महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान करू दिलं पाहिजे. स्तनपान केल्यानंतर 10 मिनिटं खांद्यावर घेऊन त्यांना ढेकर काढायला हवा. बाळांना रात्री आपल्याबरोबर झोपवलं पाहिजे, जेणेकरून मूल खूप चांगल्या पद्धतीने झोपू शकतं. नवजात बाळ रडलं तर त्याच्यावर स्वतःच्या मनानं कोणताही उपाय किंवा इलाज करू नये. त्यांच्या कानात किंवा नाकात तेल वगैरे घालू नये. अशामुळे संसर्ग होण्याचा धोका संभवतो. बाळ जास्तच रडत असेल तर डॉक्टरांना अवश्य दाखवावं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मुलांना आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी त्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. मुलांना उचलून घेण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा संसर्ग पसरणार नाही. घरात कोणाला सर्दी, खोकला किंवा ताप असेल, तर बालकांपासून दूर राहावं किंवा मास्कचा वापर करावा. याखेरीज एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नवजात बालकाला एक वर्षभर पोटावर (पालथं) झोपवू नये. बाळ असं झोपल्यास त्याचं आरोग्य बिघडू शकतं. बाळ जास्तच रडलं किंवा स्तनपान कमी झालं किंवा त्याला स्तनपान मिळालं नाही, ताप आला तर घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
रात्री जास्त का रडतात न्यूबॉर्न बेबी? काय आहे कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल