TRENDING:

GK : जगातील सर्वात महाग आंबा, 1 किलोच्या किमतीत येईल लक्झरी बाईक

Last Updated:

हे ऐकायला जरी विश्वास न बसणारं वाटत असलं, तरी जगात असा एक आंबा अस्तित्वात आहे, ज्याची किंमत ऐकून भल्याभल्यांना घाम फुटतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते फळांच्या राजाचे म्हणजेच आंब्याचे. सध्या बाजारात पायरी, हापूस आणि केसर आंब्यांची आवक सुरू झाली आहे. सामान्यतः आपण 100 रुपये डझनपासून ते 700-800 रुपये डझनपर्यंत आंबे विकत घेतो. पण, जर कोणी तुम्हाला सांगितलं की एक असा आंबा आहे ज्याच्या एका पेटीच्या किंमतीत तुम्ही कार विकत घेऊ शकता, धक्का बसला ना? पण हे खरं आहे.....
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

हे ऐकायला जरी विश्वास न बसणारं वाटत असलं, तरी जगात असा एक आंबा अस्तित्वात आहे, ज्याची किंमत ऐकून भल्याभल्यांना घाम फुटतो. आपण बोलत आहोत जगप्रसिद्ध मियाझाकी आंब्याबद्दल. याला एग ऑफ द सन (Egg of the Sun) म्हणजेच सूर्याचे अंड' असेही म्हटले जाते. केवळ चवीसाठीच नाही, तर आपल्या गगनचुंबी किमतीमुळे हा आंबा सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

advertisement

नेमकी किंमत किती?

आंतरराष्ट्रीय बाजारात मियाझाकी आंब्याची किंमत सुमारे 2.5 ते 3 लाख रुपये प्रति किलो इतकी आहे. विचार करा, 3 लाख रुपयांत भारतात एक चांगली सेकंड हॅन्ड कार किंवा एक ब्रँडेड लक्झरी बाईक आरामात येऊ शकते. मुळचा जपानमधील हा आंबा आता भारतातही काही ठिकाणी पिकवला जात आहे, पण त्याची किंमत आजही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

advertisement

हा आंबा इतका महाग का? काय आहे याचं 'स्पेशल' विज्ञान?

मियाझाकी आंबा महाग असण्यामागे त्याची दुर्मिळता आणि तो पिकवण्याची अत्यंत कठीण पद्धत कारणीभूत आहे. प्रत्येक आंब्याची जोपासना एखाद्या लहान बाळाप्रमाणे केली जाते. या आंब्यांना झाडावर असतानाच जाळीने बांधले जाते, जेणेकरून ते खाली पडून खराब होणार नाहीत. या फळावर सूर्याचा प्रकाश थेट पडेल अशी व्यवस्था केली जाते, ज्यामुळे त्याचा रंग गडद लाल किंवा जांभळा होतो.

advertisement

केवळ तेच आंबे मियाझाकी नावाने विकले जातात, ज्यांचे वजन किमान 350 ग्रॅम असते आणि ज्यामध्ये साखरेचे प्रमाण 15 टक्क्यांहून अधिक असते.

चवीला कसा असतो हा आंबा?

ज्यांनी हा आंबा चाखला आहे, त्यांच्या मते याची चव कोणत्याही सामान्य आंब्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. हा आंबा प्रचंड रसाळ आणि लोण्यासारखा मलाईदार असतो. तोंडात टाकताच तो विरघळतो. याचा गोडवा अतिशय संतुलित असतो आणि एक वेगळाच सुवास या फळातून येतो, जो संपूर्ण खोली दरवळून टाकू शकतो.

advertisement

हा आंबा इतका मौल्यवान आहे की, त्याच्या चोरीच्या भीतीने शेतकरी हैराण असतात. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका शेतकऱ्याने जेव्हा आपल्या बागेत हे आंबे लावले होते, तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी चक्क खासगी सुरक्षारक्षक (Guards) आणि शिकारी कुत्रे तैनात केले होते. ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. जपानमध्ये हा आंबा प्रामुख्याने खास प्रसंगी भेट म्हणून दिला जातो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

आंबा हे केवळ फळ नसून ते एक स्टेटस सिम्बॉल बनू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मियाझाकी. जरी आपण हा आंबा रोज खाऊ शकत नसलो, तरी निसर्गाची ही किमया खरोखरच थक्क करणारी आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
GK : जगातील सर्वात महाग आंबा, 1 किलोच्या किमतीत येईल लक्झरी बाईक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल