थंडीचा हंगाम म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने चांगला मानला जातो. या काळात प्रकृतीची व्यवस्थित काळजी घेतली आणि व्यायामात सातत्य राखून योग्य आहार ठेवला, तर पुढचं वर्षभर प्रकृती चांगलं राखण्यास मदत होते. कारण प्रतिकारशक्ती सुधारते. थंडीच्या हंगामात संसर्ग होण्याची शक्यताही असते. त्यामुळेही काळजी घ्यावी लागते. म्हणूनच या काळात ड्रायफ्रूट्स आणि नट्स आहारात ठेवावेत.
advertisement
हिवाळ्यात ड्राय फ्रूट्सचा चांगला उपयोग होतो. कारण त्यामध्ये खूप व्हिटॅमिन्स आणि खनिजं असतात. त्यांचे आरोग्याला खूप लाभ होतात. हिवाळ्यातल्या आहारात त्यांचा समावेश केल्यास नक्कीच प्रतिकारशक्ती सुधारते, शरीराला पोषण मिळतं, त्वचा तजेलदार होते, ऊर्जा वाढते आणि कायम राहते. या काळात कोणती ड्रायफ्रूट्स आहारात असणं चांगलं, त्याबद्दल जाणून घेऊ या.
बदाम : बदामाला पोषणमूल्यांचं भांडार म्हटलं जातं. त्यात अनेक आवश्यक पोषक द्रव्यं आणि उपयुक्त फॅट्स असतात. त्यांचा उपयोग एकंदर आरोग्य चांगलं राखण्यासाठी होतो. व्हिटॅमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरससह अन्य महत्त्वाचे पोषक घटक यात असतात. त्यामुळे उत्तम रोगप्रतिकारशक्तीसाठी बदामांचा खूप उपयोग होतो. हिवाळ्यातल्या आहारात बदामांचा आवर्जून समावेश करावा. कारण त्याचा उपयोग एकंदर आरोग्य चांगलं करण्यासाठी होऊ शकतो.
खजूर : हिवाळ्याच्या काळात आहार खजूर असणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. थंडीचे दिवस सुरू झाले, की आर्थ्रायटिस असलेल्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. खजुरात मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर असतं. तसंच, त्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे वेदना कमी करून आराम पडण्यासाठी खजूर उपयुक्त ठरतात. थंडीच्या दिवसांत शरीराला आवश्यक असलेली उष्णता देण्याचं कामही खजूर करतात.
पिस्ता : पिस्ता हा बहुतांश जणांना आवडणारा सुका मेवा आहे. तो एकंदर आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करतो. हृदयाचं आरोग्य चांगलं राखून वजनाच्या व्यवस्थापनातही त्यांचा उपयोग होतो. तसंच, त्वचा चांगली राखण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, शरीराला पोषण मिळण्यासाठी हिवाळ्यात पिस्ते आहारात असणं आवश्यक ठरतं. त्यातले फॅट्स शरीराचं तापमान संतुलित राखण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे दीर्घ काळ टिकणारी ऊर्जा मिळते. त्यामुळे पिस्ते हे थंडीतलं उत्तम स्नॅक्स आहेत.
हॅझेलनट्स : वातावरणातलं तापमान कमी झाल्यावर शरीराला आराम आणि पोषण पुरवणारं स्नॅक्स म्हणजे हॅझेलनट्स. हिवाळ्यातल्या थकव्याशी दोन हात करण्यासाठीही हॅझेलनट्स ऊर्जा पुरवतात. त्यांचा फ्लेव्हर रिच आहे आणि आरोग्याला अनेक फायदे आहेत. त्यामुळे हिवाळ्यात त्यांचा आहारात समावेश करणं हे चवीच्या दृष्टीने आणि शरीराच्या ऊर्जेच्या दृष्टीनेही महत्त्वाचं ठरतं.
अंजीर : अंजीर या फळाला न्यूट्रिशनल पॉवरहाउस असं म्हटलं जातं. त्यात तांबं, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस असे महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे ही फळं पोट भरल्याची भावना देतात. थंडीच्या दिवसांत शरीराला आवश्यक की उष्णता या फळांपासून मिळते. तसंच, फ्लू, सर्दी वगैरे थंडीत होणारे आजार दूर ठेवण्याची शक्तीही अंजीर देतात. अस्थमा, ताप, टीबी आदींपासून संरक्षक कवचही यांपासून मिळू शकतं.
थंडीच्या दिवसांत वातावरणात निसर्गतःच कोरडेपणा आलेला असतो. साहजिकच त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. म्हणून शरीरात उष्णता राखणं, ओलावा राखणं आणि पोषण होणं महत्त्वाचं असतं. यासाठी ड्रायफ्रूट्स आणि नट्स मदत करत असल्यामुळे या दिवसांत त्यांचा आहारात समावेश करावा. त्यामुळे चयापचय क्रिया चांगली राहते. आहाराच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी हिवाळा हा चांगला काळ असतो. त्याचा उपयोग वर्षभर होत असतो.
