TRENDING:

Jalgaon: एकुलता एक मुलगा, चेन्नईत IT कंपनीत शिकायला गेला अन् 'तिथं' अघटीत घडलं, पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Last Updated:

तब्बल ३ दिवसानंतर चेन्नईच्या समुद्रात या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह आढळून आल्यामुळे पाटील कुटुंबावर

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इम्तियाज अली, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव : चेन्नईच्या समुद्रामध्ये महाराष्ट्रातील ३ मुलं वाहून गेल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील 21 वर्षीय मुलाचाा समावेश होता. तब्बल ३ दिवसानंतर चेन्नईच्या समुद्रात या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह आढळून आल्यामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या समुद्रात शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून गेली होती. यामध्ये महाराष्ट्रातील ३ मुलांचा समावेश होता. रविवारी भंडारा इथं राहणाऱ्या मयुरी चौधरी नावाच्या तरुणीचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी जळगाव इथं पाळधी इथं राहणाऱ्या जय नरेंद्र पाटील (वय २१) या तरुणाचा मृतदेह आढळला आहे.

advertisement

जय हा पाळधी तालुका जामनेर येथील नरेंद्र रामलाल पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. वडील नरेंद्र पाटील हे शेतकरी असून आई ही पाळधी येथील नाईक विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या जय पाटील यांच्या बहिणीचे बारावीचे पेपर सुरू आहेत, तर जय हा इंटर्नशिपसाठी चेन्नई इथं गेला होता. चेन्नई येथील कॉग्नीझंट या आयटी कंपनीत जय हा इंटर्नशिप करत होता.

advertisement

काय घडलं नेमकं? 

शनिवारी सुट्टी होती, त्यामुळे जय आणि त्याच्यासोबत असलेल्या २६ जणांचा ग्रुप हा चेन्नईच्या पुद्दुचेरी रोडवर असलेल्या कांथाट्टूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बीचवर फिरायला गेले होते.  समुद्राच्या किनाऱ्याजवळ उभं राहून सेल्फी काढत होते. पण, समुद्र खवळलेला होता, त्यामुळे कुणालाही पाण्याचा अंदाज आला नाही. अचानक १० ते १५ फुटांचा लाट आली आणि तीन जणांना सोबत घेऊन गेली. यामध्ये जयसह महारााष्ट्रातील ३ जण लाटेमध्ये वाहून गेले. रविवारी दुसऱ्या दिवशी भंडाऱ्यातील मयुरी चौधरी नावाच्या तरुणीचा मृतदेह आढळला आहे. पण, जय पाटील याचा मृतदेह हाती लाागला नव्हता. ३ दिवश शोध घेतल्यानंतर अखेरीस सोमवारी त्याचा मृतदेह किनाऱ्यावर आढळला.

advertisement

एका तरुणाला वाचवलं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबला 13000 रुपये भाव, आल्याचे दरही सुधारले, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

दरम्यान, या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकारशी संवाद साधून ताातडीने मदत कार्य करण्याची विनंती केली होती. तामिळनाडू पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी रेस्क्यू मिशन राबवलं.  26 पैकी केवळ 3 विद्यार्थी पाण्यात उतरले होते. भंडाऱ्यातील मयुरी चौधरी आणि जळगावच्या जय पाटील याचा मृत्यू झाला आहे. तर राज केदारी या तरुणाला सुरक्षितपणे वाचवण्यात आलं होतं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: एकुलता एक मुलगा, चेन्नईत IT कंपनीत शिकायला गेला अन् 'तिथं' अघटीत घडलं, पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल