TRENDING:

400 कोटी रुपयांनी भरलेल्या 2 कंटेनर चोरी प्रकरणाला नवं वळण, CID ची एंट्री; तपास पुन्हा होणार

Last Updated:

 तब्बल ४०० कोटी रुपयांच्या कथित प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे.  ४०० कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणाचा सीआयडी तपास करणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
नाशिक : एखाद्या हॉलिवूड सिनेमाला लाजवेल अशा आरोपाची घटना नाशिकमध्ये घडली होती. तब्बल ४०० कोटी रुपये ज्या २००० रुपयांच्या बनावट नोटा आहे, त्या दोन कंटेनरमध्ये भरलेल्या होत्या. हे दोन्ही कंटेनर घाटामध्ये चोरीला गेले, असा आरोप एका तरुणाने केला. या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तपास केला आणि तक्रार खोटी असल्याचा आरोप दिला. पण, आता या प्रकरणात सीआयडीची एंट्री झाली आहे. त्यामुळे तपासाला नवं वळण मिळालं आहे.
News18
News18
advertisement

तब्बल ४०० कोटी रुपयांच्या कथित प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे.  ४०० कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणाचा सीआयडी तपास करणार आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी दिलेल्या क्लोजर रिपोर्टवरच मोठा संशय निर्माण झाला आहे.  नाशिक पोलिसांनी तक्रारदार संदीप पाटीलने खोटी तक्रार केल्याचा दावा केला होता.  तर नाशिक पोलिसांच्या तपासावर तक्रारदार संदीप पाटीलनेच गंभीर आरोप केले होते.  त्यामुळे आता सीआयडीकडून या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी जाणार आहे.

advertisement

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील चोरला घाटातून ४०० कोटी रुपयांचे ट्रक चोरीला गेल्याचं प्रकरण देशभरात चर्चेत आलं होतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थेट टेरेसवर भरते कवितांची मैफिल, मनाला भिडणारं संभाजीनगरमधील गेट-टुगेदर, Video
सर्व पहा

कर्नाटकमधील चोरली घाटात ही १६ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. २००० रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेला हा कंटेनर होता. नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाच्या अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणाच्या तपासातून ही ४०० कोटी रुपयांची घटना उजेडात आली होती. या प्रकरणी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी, जनार्दन धायगुडे (मुंबई) याच्याविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी संदीप पाटील नावाच्या तरुणाने एका व्हिडीओमध्ये हा धक्कादायक खुलासा केला होता. पण, संदीप पाटील यांच्या अपहरण प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. आरोपींनाा कोर्टात हजर केलं आणि जाामीनही मिळाला. नााशिक पोलिसांनी प्रकरण बंदही केलं होतं. पण, आता सीआयडी काय तपास करणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
400 कोटी रुपयांनी भरलेल्या 2 कंटेनर चोरी प्रकरणाला नवं वळण, CID ची एंट्री; तपास पुन्हा होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल