TRENDING:

8 महिला, 35 व्हिडीओ नीरज नाही तर 'या' व्यक्तीने समोर आणला भोंदू खरातचा चेहरा, फडणवीसांनी नावचं सांगितलं

Last Updated:

खरातची भोंदूगिरी कशी समोर आली या संदर्भात माहिती दिली. या प्रकरणी आठ महिलाांचे 35 व्हिडिओ सापडल्याची माहिती फडणवीसांनी दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्याचं राजकारण प्रचंड तापले असून
News18
News18
advertisement

विधानसभेत सोमवारी मोठा गदारोळ झाला. ‘या प्रकरणातील कोणालाही ‘क्लीन चिट’ दिली जाणार नाही, तसेच दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही’, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. शिवाय या संपूर्ण प्रकरणावर मंगळवारी सभागृहात सविस्तर निवेदन करताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. खरातची भोंदूगिरी कशी समोर आली या संदर्भात माहिती दिली. या प्रकरणी आठ महिलाांचे 35 व्हिडिओ सापडल्याची माहिती फडणवीसांनी दिला आहे.

advertisement

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 18 फेब्रुवारी रोजी एका महिलेने नीरज जाधव याने व्हॉट्सअॅपवर अश्लील फोटो शेअर केला आणि व्हायरल करण्याची धमकी दिली अशी तक्रार शिर्डी पोलिसांमध्ये देण्यात आला आहे. महिलेने ही धमकी देणाऱ्या इसमाचा नंबर दिला नाही, मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपासाला सुरूवात केली. आरोपी नीरज जाधव याचा शोध घेताना अशोक खरात यांच्याशी संबंधित योगेश भालेराव या साक्षीदाराने काही व्हिडीओ दाखवले. खरातने तंत्रमंत्र वापरून महिलांशी अश्लिल चाळे केल्याचं समोर आलं आहे.

advertisement

साक्षीदाराने पोलिसांनी कोणते व्हिडीओ दाखवले?

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, अशोक खरातने 8 महिलांचे 35 व्हिडीओ दाखवले. त्या व्हिडीओमध्ये खरातने महिलांचे लैंगिक शोषण करत त्यांच्याशी अश्लील चाळे करत करत अल्याचे समोर आले. ज्या साक्षीदाराने पोलिसांना व्हिडीओ दाखवण्याची हिंमत केली त्या साक्षीदाराला खरातने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो सहजासहजी व्हिडीओ देण्यास तयार नव्हता. पोलिसांनी त्याला सुरक्षेची हमी दिली त्यानंतर साक्षीदाराने व्हिडीओ दिले. आरोपी अशोक खरात दुसऱ्या देशात पळून जाण्याची भीती होती. त्यामुळे पोलिसांनी एअरपोर्ट ऑथरिटीला लूकआऊट नोटीस जारी कर परदेशात जाण्यास बंदी घातली.

advertisement

मोबाईलमधील डेटा हस्तगत करण्याचे काम सुरू

आरोपीचे दोन लॅपटॉप, आरोपीचे मिरगाव येथील फार्महाऊस येथे झडती घेतली असताना एक डीव्हीआर, एर रिव्हाॉलवर, 21 जीवंत काडतूस, पाच फायर केलेल्या काडतसू, खरेदी खताची झेरॉक्स जप्त करण्यात आली आहे. मोबाईल जप्त करून सायबर पोलीसांकडे पाठवण्यात आला असून डेटा संकलीत करण्याचे काम सुरू असल्याती माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली आहे.

advertisement

कोर्टात काय काय घडलं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'एक डबा दोघांमध्ये अन् रविवारी उपाशी राहावं लागतंय' पुण्यातलं वास्तव्य, विद्यार्थी निघाले गावाकडे!
सर्व पहा

महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला आज नाशिक सत्र न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातची आज पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यामुळे आज दुपारी 3.50 वाजता अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झाले, याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली. तसेच पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावेळी न्यायालाने अशोक खरातला 5 दिवसांची म्हणजेच 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
8 महिला, 35 व्हिडीओ नीरज नाही तर 'या' व्यक्तीने समोर आणला भोंदू खरातचा चेहरा, फडणवीसांनी नावचं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल