TRENDING:

मृतदेहाचं जतन करणारं केमिकल दुधात आढळलं, उडाली एकच खळबळ, महाराष्ट्रात कुठे घडला प्रकार?

Last Updated:

Milk Adulteration : करवंद गावातील लक्ष्मीबाई वाघ यांनी विकत घेतलेल्या दुधाच्या नमुन्यात घातक रसायनाची भेसळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धुळे : करवंद गावातील लक्ष्मीबाई वाघ यांनी विकत घेतलेल्या दुधाच्या नमुन्यात घातक रसायनाची भेसळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने या दुधाचा नमुना तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत संभाजीनगरच्या शासकीय प्रयोगशाळेत पाठवला होता. या तपासणीत दुधात ‘फॉर्मालिन’ हे आरोग्यासाठी अत्यंत घातक रसायन आढळल्याचे अहवालात सांगण्यात करण्यात आले आहे.
Milk Adulteration
Milk Adulteration
advertisement

प्रयोगशाळा अहवालात धक्कादायक माहिती

'दिव्य मराठी' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान या दुधात म्हशीच्या दुधासाठी आवश्यक असलेले फॅट प्रमाणही कमी असल्याचे स्पष्ट झाले. साधारणपणे म्हशीच्या दुधात किमान ५ टक्के फॅट अपेक्षित असते, मात्र तपासलेल्या नमुन्यात ते केवळ ४.३ टक्के आढळले. सर्वात गंभीर बाब म्हणजे या दुधात ‘फॉर्मालिन’ चाचणी पॉझिटिव्ह आली असून दुधात जाणीवपूर्वक घातक रसायन मिसळल्याचे सिद्ध झाले आहे.

advertisement

फॉर्मालिनचा वापर नेमका कशासाठी?

फॉर्मालिन हे अत्यंत घातक रासायनिक द्रावण असून त्याचा वापर प्रामुख्याने औद्योगिक व वैद्यकीय क्षेत्रात केला जातो. हॉस्पिटल किंवा प्रयोगशाळांमध्ये मृतदेह किंवा प्राण्यांचे अवयव सडू नयेत म्हणून ते फॉर्मालिनच्या द्रावणात ठेवले जातात. याशिवाय जंतुनाशक म्हणून, शस्त्रक्रिया कक्ष निर्जंतुक करण्यासाठी तसेच रबर, रंग आणि कापड उद्योगातही या रसायनाचा वापर केला जातो.

advertisement

दूध खराब होऊ नये म्हणून भेसळ

तज्ज्ञांच्या मते, काही विक्रेते उन्हाळ्यात किंवा लांब प्रवासादरम्यान दूध खराब होऊ नये म्हणून त्यात फॉर्मालिन मिसळतात. या रसायनामुळे दुधातील जिवाणूंची वाढ थांबते आणि दूध दीर्घकाळ खराब होत नाही. त्यामुळे दूध दोन ते तीन दिवस बाहेर ठेवले तरी ते ताजे असल्यासारखे दिसते आणि फुटत नाही. मात्र अशी भेसळ आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

advertisement

आरोग्यावर गंभीर परिणाम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्यासाठी खरेदी करा आकर्षक नॅनो गुढी, किंमत फक्त 90 रुपयांपासून, पुण्यात हे आहे लोकेशन
सर्व पहा

फॉर्मालिन हे मानवी शरीरासाठी ‘कार्सिनोजेनिक’ म्हणजेच कर्करोग निर्माण करणारे रसायन आहे. यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब यांसारखे तात्काळ त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ अशा रसायनयुक्त अन्नपदार्थांचे सेवन केल्यास मूत्रपिंड निकामी होणे, रक्ताचा कर्करोग तसेच पचनसंस्थेचे गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मृतदेहाचं जतन करणारं केमिकल दुधात आढळलं, उडाली एकच खळबळ, महाराष्ट्रात कुठे घडला प्रकार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल