TRENDING:

Weather Alert: हिटवेव आणि पाऊस महाराष्ट्रावर दुहेरी संकट! १७ फेब्रुवारीपासून हवामानात मोठा फेरबदल

Last Updated:

Weather Update: थंडी गायब, आता छत्री काढा! अरबी समुद्रातून येतंय बाष्प; पुणे, कोल्हापूरसह 'या' पट्ट्यात पावसाची शक्यता! ४८ तासांचा मोठी हवापालट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय? पाहा लेटेस्ट अपडेट

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आजचं हवामान: राज्यातून थंडी आता अधिकृतपणे काढता पाय घेत आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे काहीसे मंदावले असून, आता बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागले आहेत. यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत राज्यातून थंडी कायमची गायब होईल आणि चटका वाढण्यासोबतच काही भागांत पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
पावसाचा अलर्ट
पावसाचा अलर्ट
advertisement

पुणे, कोल्हापूर, सातारा पट्ट्यात पावसाचे सावट

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांच्या मिलाफामुळे महाराष्ट्रावर पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. याचा सर्वाधिक परिणाम पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे.

१७ आणि १८ फेब्रुवारीच्या सुमारास या भागात आकाश ढगाळ राहील आणि काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. याव्यतिरिक्त सोलापूर आणि अहिल्यानगर भागातही पावसाचा शिडकावा पाहायला मिळू शकतो.

advertisement

कोकणात उकाडा, तर विदर्भात संमिश्र हवामान

मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी पट्ट्यात सध्या उष्णता वाढू लागली आहे. दिवसा उन्हाचा चटका चांगलाच जाणवत असून रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा वर गेले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र पुढील ४८ तास संमिश्र हवामान राहील. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रात्रीचा हलका गारवा टिकून असला, तरी १८ फेब्रुवारीनंतर तिथेही उन्हाची तीव्रता वाढणार आहे.

advertisement

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

सध्या रब्बी पिके काढणीच्या उंबरठ्यावर असताना, पावसाचा अंदाज ऐकून बळीराजा चिंतेत होता. मात्र, दिलासादायक बाब अशी की, हा पाऊस खूप मोठा किंवा वादळी नसेल. ओलावृष्टी किंवा गारपिटीची शक्यता नसल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होणार नाही. उलट, हा हलका पाऊस काही भागांतील पिकांसाठी पूरक ठरू शकतो.

दक्षिण भारतात मात्र मुसळधार

advertisement

महाराष्ट्रात केवळ शिडकावा अपेक्षित असताना, दक्षिण भारतात मात्र निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळणार आहे. १७ आणि १८ फेब्रुवारीला तमिळनाडू आणि केरळच्या काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याच्या दरात मोठी उलथापालथ, डाळींब आणि केळीला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

कन्याकुमारी, मदुराई आणि कोल्लम या भागात पावसाचा जोर अधिक असेल. थंडी आता शेवटच्या घटका मोजत असून, पुढील आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरू होईल. १८ फेब्रुवारीनंतर रात्रीचे तापमानही वाढायला सुरुवात होणार असल्याने उबदार कपडे आता कपाटात ठेवण्याची वेळ आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Alert: हिटवेव आणि पाऊस महाराष्ट्रावर दुहेरी संकट! १७ फेब्रुवारीपासून हवामानात मोठा फेरबदल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल