TRENDING:

आजचं हवामान: पुणे-कोल्हापूरसाठी 5 तास धोक्याचे, विदर्भ-मराठवाड्यात कसं असेल हवामान?

Last Updated:

पालघर, ठाणे, मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात 27-30 जून अतिवृष्टीचा इशारा आहे. विदर्भात 26-29 जून वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पालघर, ठाणे, मुंबईत पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र सिंधुदुर्ग, रत्नागिरीत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पुन्हा मुसळधार पाऊस होणार आहे. 27 ते 30 जून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या भागात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं.
News18
News18
advertisement

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे शहरात मात्र पुढचे चार दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील, त्यामुळे पावसापासून थोडी विश्रांती मिळणार आहे. पुणे घाटमाथ्यावर मात्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरात देखील घाटमाथ्यावर आणि साताऱ्यातही घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात मात्र हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.

advertisement

बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव जिल्ह्यात पाऊस पुढचे चार दिवस विश्रांती घेईल. एक दोन ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. मान्सून आला तरीसुद्धा अजूनही म्हणावं तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर होत आहे. विदर्भातील नागरिकांसाठी पुढचे चार दिवस हवामानाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आजपासून म्हणजेच २६ जूनपासून २९ जूनपर्यंत अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळात वादळ आणि पावसाचा जोर राहणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक दिवशी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी. विशेषतः शेतकऱ्यांनी पिकांची सुरक्षितता पाहून योग्य ती खबरदारी घ्यावी.

पावसाळ्यात मेकअप करताना ही चूक तर करत नाही ना? अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम

advertisement

विदर्भातील नागरिकांसाठी पुढचे चार दिवस हवामानाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आजपासून म्हणजेच २६ जूनपासून २९ जूनपर्यंत अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळी सुट्ट्यांत फिरायला जाण्यासाठी खरेदी करा बॅग्स, किंमत 50 रुपयांपासून, हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक दिवशी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी. विशेषतः शेतकऱ्यांनी पिकांची सुरक्षितता पाहून योग्य ती खबरदारी घ्यावी. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही दिवसांसाठी अधिक तीव्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: पुणे-कोल्हापूरसाठी 5 तास धोक्याचे, विदर्भ-मराठवाड्यात कसं असेल हवामान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल