Monsoons Makeup Tips: पावसाळ्यात मेकअप करताना ही चूक तर करत नाही ना? अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम

Last Updated:

ऋतू कोणताही असो, महिलांना कुठे जायचं असल्यास मेकअप तर त्या करतातच. पण, पावसाळ्यात मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

+
News18

News18

अमरावती: ऋतू कोणताही असो, महिलांना कुठे जायचं असल्यास मेकअप तर त्या करतातच. पण, पावसाळ्यात मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही ती काळजी घेतली नाही तर तुमच्या चेहऱ्यावर फंगल इन्फेक्शनसारखे त्वचाविकार होऊ शकतात. घरच्या घरी मेकअप करण्यासाठी प्रत्येक महिलांकडे मेकअप ब्रश आणि ब्लेंडर हे असतातच. मेकअप करून झाल्यानंतर ते ब्रश तसेच ठेवून दिले जातात. पण, ही चूक अतिशय महाग पडू शकते. त्यामुळे मेकअप झाल्यानंतर मेकअप ब्रश आणि ब्लेंडर स्वच्छ धुवून आणि कोरडे करून ठेवायला हवेत. असं न केल्यास काय होऊ शकतं? पावसाळ्यात मेकअप करताना कोणत्या चुका टाळाव्यात याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
पावसाळ्यात मेकअप करताना कोणत्या चुका टाळाव्यात याबाबत माहिती देताना त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, पावसाळ्यात सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे त्वचेसाठी वापरण्यात येणारे कोणतेही कापड, ब्रश हे ओलसर नसावेत. ते जर ओलसर असेल तर त्या माध्यमातून अनेक त्वचाविकार होतात.
advertisement
बुरशी असलेले मेकअप ब्रश तर वापरत नाहीत ना?
त्याचबरोबर पावसाळ्यात मेकअप करताना तर विशेष काळजी घेणे देखील गरजेचे आहे. मेकअप करताना आता सर्वच महिला ब्रश आणि ब्लेंडर वापरतात. कारण, त्यामुळे मेकअप सेट करण्यास मदत होते. पण, ते वापरल्यानंतर स्वच्छ धुवून आणि वाळवून ठेवले आहेत का? हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ते जर स्वच्छ धुवून आणि वाळवून ठेवले असतील तर वापरल्यास काही हरकत नाही.
advertisement
पण, ते तसेच ठेवले असेल आणि त्यावर पांढरा थर आला असेल. तर ते तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असू शकते. कारण त्याला बुरशी चढलेली असते. त्यामुळे चेहऱ्यावर फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे ही काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकवेळा त्या बुरशीवर महिलांचे लक्ष देखील जात नाही. पण, ते काळजीपूर्वक बघणे महत्त्वाचे आहे.
advertisement
पावसाळ्यात कुठलीही वस्तू, कापड किंवा आणखी काही त्वचेसाठी वापरण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतल्यावरच वापरावे. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेला होणारी हानी आपल्याला टाळता येईल, असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Monsoons Makeup Tips: पावसाळ्यात मेकअप करताना ही चूक तर करत नाही ना? अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement