T20 World Cup : तिघांना हटवण्याची हिंमत BCCI दाखवणार?... तरच टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 30 रननी विजय झाला आहे. याचसोबत भारताने ही सीरिज 3-1 ने जिंकली आहे.
1/8
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची शनिवारी निवड होणार आहे. या निवडीआधी सीरिज जिंकल्यामुळे टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या आता फक्त 5 मॅच शिल्लक आहेत.

advertisement
2/8
जानेवारी महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे, त्यानंतर 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होईल. न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा शनिवारी होईल.

3/8
टी-20 वर्ल्ड कपच्या टीमची निवड करण्याआधी भारताने सीरिज जिंकली असली, तरी 3 खेळाडूंमुळे निवड समिती आणि बीसीसीआयची चिंता वाढवली आहे. यातले दोन खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत, तर एक जण टीम कॉम्बिनेशनमध्ये बसत नाही.

4/8
भारताच्या टी-20 टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा मागच्या 13 ते 14 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये संघर्ष करत आहे. मागच्या 22 टी-20 आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये सूर्याला एकही अर्धशतक करता आलेलं नाही, त्यामुळे सूर्याचा फॉर्म वर्ल्ड कपच्या तोंडावर टीमसाठी चिंतेचा विषय आहे.

5/8
टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल याच्या बॅटमधूनही रन येत नाहीयेत. गिलला मागच्या 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकही अर्धशतक करता आलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात गिल दुखापतीमुळे खेळला नाही.

6/8
गिलच्या गैरहजेरीमध्ये संजू सॅमसनला संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. संजूने 22 बॉलमध्ये 37 रन करून टीम इंडियाला आक्रमक सुरूवात करून दिली. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया गिलला बेंचवर बसवून संजूला खेळवण्याची हिंमत दाखवणार का? हा प्रश्न आहे.

7/8
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या टी-20 सीरिजसाठी हर्षित राणाही भारतीय टीममध्ये होता. बुमराहच्या गैरहजेरीत राणा तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळला, तसंच या सामन्यात त्याने उत्कृष्ट कामगिरीही केली. पण बुमराहच्या कमबॅकनंतर राणाला बाहेर बसावं लागलं.

8/8
टी-20 वर्ल्ड कपमध्ये हर्षित राणाच्याऐवजी टीम इंडिया रिंकू सिंगला संधी देऊन बॅटिंग आणखी मजबूत करू शकते. रिंकू हा फिनिशरसोबतच उत्कृष्ट फिल्डरही आहे. तसंच हर्षितला बाहेर केलं तरी टीमकडे बॉलिंगसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement