महाराष्ट्रात सापडला 2,000 वर्षांपूर्वीचा सर्वात मोठा ‘चक्रव्यूह’; सोलापूरात दडलेल्या गूढ ‘भूल भुलैया’चा शेवट कुठे?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Labyrinth Discovered Solapur: सोलापूरच्या बोरामणी गवताळ प्रदेशात दगडांत कोरलेली एक रहस्यमय वर्तुळाकार रचना आढळून आली आहे. 2,000 वर्षांपूर्वीच्या या चक्रव्यूहाने भारताच्या प्राचीन इतिहासातील अनेक दडलेली रहस्ये पुन्हा उघड केली आहेत.
advertisement
advertisement
टाइम्स ऑफ इंडिया (TOI) च्या वृत्तानुसार, सुमारे 50 फूट बाय 50 फूट आकाराची आणि 15 वळणांची (15-circuit) हा चक्रव्यूह प्रथम नेचर कन्झर्वेशन सर्कल या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांना आढळून आली. ही संस्था बोरामणी गवताळ अभयारण्यात वन्यजीव निरीक्षणाचे काम करत होती. निरीक्षणादरम्यान त्यांना ही असामान्य दगडी रचना दिसून आली, त्यानंतर त्यांनी तात्काळ पुरातत्त्व तज्ज्ञांना याची माहिती दिली.
advertisement
advertisement
ही शोधमोहीम ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. कारण ती या प्रदेशातून पूर्वी लांब पल्ल्याचे व्यापारी मार्ग जात होते, याचा ठोस पुरावा देते. सचिन पाटील यांच्या मते, हा चक्रव्यूह धाराशिव (पूर्वीचे टेर) या भागाचे रोमशी असलेले व्यापारी संबंध अधिक मजबूतपणे अधोरेखित करते, जे प्रारंभिक शतकांमध्ये अस्तित्वात होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाचे प्रमुख पी. डी. साबळे यांनी सांगितले की, हा शोध या भागातील पूर्वीच्या निष्कर्षांशी सुसंगत आहे. ते म्हणाले, “कोल्हापूर, कराड आणि टेर हा परिसर परकीय व्यापाराचा एक मोठा केंद्रबिंदू होता,” असे सांगताना त्यांनी जवळच्या भागात सापडलेल्या ग्रीको-रोमन काळातील अवशेषांचा संदर्भ दिला.
advertisement
आतापर्यंत भारतात सापडलेली सर्वात मोठी वर्तुळाकार लॅबिरिंथ फक्त 11 वळणांची होती. जरी तामिळनाडूतील गेडिमेडू येथे एक मोठी चौकोनी लॅबिरिंथ अस्तित्वात असली, तरी सोलापूरमध्ये सापडलेली ही नवी रचना भारतातील सर्वात मोठी वर्तुळाकार लॅबिरिंथ ठरते आणि आकारमानाच्या दृष्टीने ती देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लॅबिरिंथ आहे.








