advertisement

Cibil score Facts: सारखं सारखं तपासून पाहिल्याने तुमचा Cibil score कमी होतो का?

Last Updated:
सिबिल स्कोअर हा आर्थिक शिस्तीचा रिपोर्ट कार्ड आहे. RBIच्या नवीन नियमांनुसार, स्कोअर १५ दिवसांत अपडेट होईल. हार्ड इन्क्वायरीमुळे स्कोअर कमी होऊ शकतो.
1/7
आजकाल सिबिल स्कोअर म्हणजे एक ट्रेंड झाला आहे. अगदी लग्नापासून ते लोनपर्यंत तो महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा झाला आहे. जर सिबिल स्कोअर चांगला नसेल तर मुली लग्नाला तयार होत नाहीत. अनेकदा आपण ऐकतो की, आपला सिबिल स्कोअर वारंवार पाहिला तर तो कमी होतो. सिबिल स्कोअर हा तुमच्या आर्थिक शिस्तीचा रिपोर्ट कार्ड असतो. ७५० पेक्षा जास्त स्कोअर असेल तर तुम्हाला बँकांकडून सहज कर्ज मिळतं. पण तो चेक करण्याच्या पद्धतीवरून तुमचा स्कोअर ठरू शकतो.

2/7
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आता यासंदर्भात काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत. तुमचा स्कोअर कमी होतो की नाही, हे तुम्ही तो कसा चेक करता यावर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही स्वतः सिबिलच्या वेबसाइटवर किंवा अधिकृत ॲपवर तुमचा स्कोअर पाहता, तेव्हा त्याला सॉफ्ट इन्क्वायरी म्हणतात.

3/7
तुम्ही महिन्यातून कितीही वेळा तुमचा स्कोअर चेक केला, तरी तुमच्या स्कोअरवर काहीही परिणाम होत नाही. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्ही कितीही वेळा हे करु शकता. त्यामुळे जे तुम्हाला असं सांगतील तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.

4/7
जेव्हा तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी बँकेत अर्ज करता आणि बँक तुमची पत तपासण्यासाठी सिबिल स्कोअर चेक करते, त्याला हार्ड इन्क्वायरी म्हणतात. कमी वेळात अनेक बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज केल्यास अनेक 'हार्ड इन्क्वायरी' होतात, ज्याचा तुमच्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.

5/7
आरबीआयने १ जानेवारी २०२५ पासून लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, आता तुमचा सिबिल स्कोअर अधिक वेगाने अपडेट होणार आहे: १. १५ दिवसांत अपडेट: पूर्वी बँका महिन्याभराची माहिती अपडेट करायच्या. आता बँका आणि फायनान्स कंपन्यांना दर १५ दिवसांनी तुमची क्रेडिट माहिती अपडेट करावी लागेल.

6/7
 याचा अर्थ, जर तुम्ही वेळेवर हप्ते भरले तर त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या स्कोअरवर आता लवकर दिसेल. २. एकाधिक अर्जांबाबत सावधानता: कमी कालावधीत अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज केल्यास त्याचा स्कोअरवर होणारा नकारात्मक परिणाम आता पूर्वीपेक्षा जास्त असू शकतो.

7/7
तुमचा स्कोअर ७५० च्या वर राखण्यासाठी नेहमी तुमचे सर्व बिल्स वेळेवर भरा. गरज असेल तरच नवीन कर्जासाठी अर्ज करा आणि आपला स्कोअर नियमितपणे मॉनिटर करा. स्कोअर चेक करण्यासाठी नेहमी सिबिलची अधिकृत वेबसाइट किंवा आरबीआय मान्यताप्राप्त ॲप्सचाच वापर करा

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement