Worli-Sewri Elevated Road : मुंबईकरांसाठी खुशखबर! वरळी-शिवडी उन्नत मार्गाबाबत आली मोठी अपडेट; कसा आणि कुठे जोडला जाणार?
Last Updated:
Worli-Sewri Elevated Road Update : वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक सुलभ होणार आहे. मात्र हा मार्ग कोणत्या अन्य मार्गाला जोडणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबई : मुंबईतील सर्वाधिक चर्चेत आलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गाला सध्या वेग मिळत असून हा दक्षिण मुंबईसाठी एक महत्त्वाचा कनेक्टिव्हिटी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून प्रभादेवी येथे एक डबलडेक उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरु आहे. पण पार्श्वभूमीवर हा मार्ग नेमका कसा असणार आणि त्याची जोडणी कुठे होणार, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मध्य-पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर डबल-डेकर पूल
वरळी-शिवडी उन्नत मार्ग हा दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा आहे. पण या मार्गात अनेक स्थानकांचे घरे आणि इमारती असल्याने या प्रकल्पाला वेळ लागला आहे. मात्र यातील लक्ष्मी निवासाचे पाडकाम तसेच पुनर्वसनातील एक अडथळा दूर झाल्याने प्रकल्पाला गती मिळाली आहे.
दरम्यान या उन्नत मार्गासाठी प्रभादेवीमध्ये एक डबलडेक उड्डाणपूल उभारण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे, त्यासाठी तब्बल 100 वर्ष जुना प्रभादेवी उड्डाणपुलाचं पाडकाम सुरु झालं आहे. यातही दोन इमारती अडथळा ठरत होत असल्याने तेथील नागरिकांचे पुनर्वसन करुन या इमारतीही पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
कोणते रस्ते जोडले जाणार?
पुनर्बांधी केलेला प्रभादेवी पूल हा सेनापती बापट मार्गाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाशी जोडला जाणार आहे. डबल डेकर उड्डाणपूल हा दोन दिशांना जोडला जाणार आहे. त्यात एक भाग वांद्रे-वरळी सी-लिंकला आणि दुसरा भाग हा शिवडी येथील अटल सेतूला जोडला जाणार आहे. तयार होणार हा पूल जमिनीपासून साधारण 27 मीटर उंचीवर बांधण्यात येत असून तो पूर्व द्रुतगती मार्ग, बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील उड्डाणपूल तसेच दक्षिण मुंबईतील रेल्वे मार्गांवरुन जाणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 8:28 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Worli-Sewri Elevated Road : मुंबईकरांसाठी खुशखबर! वरळी-शिवडी उन्नत मार्गाबाबत आली मोठी अपडेट; कसा आणि कुठे जोडला जाणार?








