advertisement

PSL Ball Tampering : LIVE मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडूंकडून बॉल टेम्परिंग, फखर जमानचं कृत्य कॅमेऱ्यात कैद!

Last Updated:

PSL 2026 Ball Tampering Controversy : कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदी, फखर जमान आणि रौफ हे तिघंही एका ठिकाणी जमा झाले. सर्वांनी घोळका केला. त्याचवेळी बॉल फखर जमानच्या हाती होता.

PSL 2026 Ball Tampering Controversy Lahore Qalandars
PSL 2026 Ball Tampering Controversy Lahore Qalandars
PSL 2026 Ball Tampering Lahore Qalandars : आधीच गरिबीमुळे बदनाम असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॅच जिंकण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंनी थेट क्रिकेटला खाली मान घालण्याची वेळ आणली आहे. लाहोर कलंदर्सचा स्टार बॅट्समन फखर जमान याच्यावर बॉल टॅम्परिंगचा गंभीर आरोप करण्यात आला असून लाहोर कलंदर्स संघावर पेन्लटी देखील लावण्यात आली आहे. रविवारी कराची किंग्स विरुद्ध झालेल्या अत्यंत चुरशीच्या मॅचमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. या कृतीमुळे कराची किंग्सला 5 पेनल्टी रन्स देण्यात आले, ज्याचा परिणाम थेट मॅचच्या निकालावर झाल्याचं पहायला मिळालं.

नेमकं काय घडलं?

सदर घटना मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये घडली. कराचीला विजयासाठी 14 रन्सची गरज होती. हॅरिस रौफ बॉलिंगसाठी येत असताना कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदी, फखर जमान आणि रौफ हे तिघंही एका ठिकाणी जमा झाले. सर्वांनी घोळका केला. त्याचवेळी बॉल फखर जमानच्या हाती होता. बॉल हाताळत चर्चा करत होते. त्यावेळी फखरने मुद्दामहून बॉलसोबत छेडछाड केली. पण अंपायरच्या नरजेतून ही गोष्ट वाचली नाही.
advertisement
advertisement

फखर जमान विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई

अंपायर फैसल आफ्रिदी यांनी बॉल तपासून तो जाणीवपूर्वक खराब केल्याचा निर्णय दिला. यामुळे कराचीला पाच धावांची पेन्ल्टी लावण्यात आली. कराचीला केवळ 6 बॉलमध्ये 9 रन्सचे सोपं समीकरण मिळालं. कराची किंग्सच्या अब्बास आफ्रिदीने शेवटच्या ओव्हरमध्ये एक फोर आणि एक सिक्स मारून 19.3 ओव्हरमध्येच विजय मिळवला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) फखर जमान विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली आहे. मात्र, या घटनेने सर्वजण हादरले आहेत.
advertisement

अंपायरच्या निर्णयामुळे शाहीन आफ्रिदी नाराज

advertisement
दरम्यान, अंपायरच्या निर्णयामुळे शाहीन आफ्रिदी स्पष्टपणे नाराज झाला होता. पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये, शाहीनने सांगितलं की पेनल्टीचे कारण त्याला समजू शकलं नाही. त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या प्रकरणी कोणतेही निवेदन जारी केलं नाही. त्यामुळे आता पीसीबी या गंभीर प्रकरणावर कोणता निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PSL Ball Tampering : LIVE मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडूंकडून बॉल टेम्परिंग, फखर जमानचं कृत्य कॅमेऱ्यात कैद!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement