advertisement

PSL 2026 : 'मी चूक केली पण...', डेव्हिड वॉर्नरने कुणाला दिलं विजयाचं क्रेडिट? सांगितला मॅचचा टर्निंग पाईंट!

Last Updated:

PSL 2026 David Warner Statement : मला फारशी काळजी वाटली नाही. माझे पूर्ण लक्ष आमच्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यावर होते, असं वॉर्नर म्हणाला.

PSL 2026 Karachi Captain David Warner Statement
PSL 2026 Karachi Captain David Warner Statement
Karachi Captain David Warner Statement : पाकिस्तान सुपर लीग (PSL 2026) मध्ये कराची किंग्सने आपल्या नावाचा दबदबा निर्माण करताना क्वेटा ग्लॅडिएटर्सचा 14 रन्सने पराभव केला. कॅप्टन डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील कराचीने पहिल्यांदा बॅटिंग करताना 181 रन्सचे तगडं आव्हान उभं केलं होतं. प्रत्युत्तरात क्वेटाची टीम 20 ओव्हरमध्ये 167 रन्सपर्यंतच मजल मारू शकली. कराचीच्या या विजयात मोईन अलीची फटकेबाजी आणि स्पिनर्सची शिस्तबद्ध बॉलिंग निर्णायक ठरली. पण कॅप्टन डेव्हिड वॉर्नरने कुणाला विजयाचं क्रेडिट दिलंय? पाहा

"बॅटिंग करताना मधल्या ओव्हरमध्ये मी..."

मॅचनंतर पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये वॉर्नर म्हणाला की, सुरुवातीला 170 रन्सचे टार्गेट आव्हानात्मक असेल असं वाटलं होतं. मात्र, मोईन अलीच्या फटकेबाजीमुळे टीमने 181 रन्सपर्यंत मजल मारली. बॅटिंग करताना मधल्या ओव्हरमध्ये मी आणि इतर काही खेळाडूंनी खराब शॉट सिलेक्शनमुळे आपल्या विकेट्स गमावल्या होत्या, ज्यामुळे टीम काही काळ दबावात आली होती. मला फारशी काळजी वाटली नाही. माझे पूर्ण लक्ष आमच्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यावर होते, असं वॉर्नर म्हणाला.
advertisement

सलमान आगा आणि इतर ऑफ-स्पिनचे कौतुक

पुढं बोलताना वॉर्नरने सांगितलं की, मॅचमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सने 52 रन्सची वादळी सुरुवात केली होती. डॉट बॉलमुळे क्वेटाची स्कोरबोर्ड मंदावला आणि तिथूनच मॅचचं पारडे कराचीच्या बाजूने झुकलं. वॉर्नरने विशेषतः सलमान आगा आणि इतर ऑफ-स्पिन पर्यायांचे कौतुक केलं. आमच्याकडे सलमान सारखे दर्जेदार ऑफ-स्पिन पर्याय उपलब्ध होता, ज्याने आमचं काम अधिक सोपं केलं, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला.
advertisement

मोईन अलीची 48 रन्सची वादळी इनिंग 

मॅचची सुरुवात कराची किंग्ससाठी निराशाजनक झाली होती. मात्र, कॅप्टन डेविड वॉर्नरने आक्रमक पवित्रा घेत 22 बॉलमध्ये 35 रन्सची खेळी करून डावाला गती दिली. मधल्या फळीत साद बेग (30) आणि सलमान आगा (22) यांनी छोटेखानी योगदान दिले, पण खराब शॉट सिलेक्शनमुळे टीमने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. मोईन अली कराचीसाठी संकटमोचक ठरला. मोईनने अवघ्या 29 बॉलमध्ये नाबाद 48 रन्सची वादळी इनिंग खेळली, ज्यामध्ये 4 फोर आणि 3 उत्तुंग सिक्सचा समावेश होता.
advertisement

कराचीच्या स्पिनर्सकडून कमबॅक

विजयासाठी 182 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना क्वेटा ग्लॅडिएटर्सला शमिल हुसैन आणि कॅप्टन सऊद शकीलने विजांच्या वेगाने सुरुवात करून दिली. शमिलने केवळ 24 बॉलमध्ये 52 रन्स कुटले, ज्यात 5 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. त्यामुळे मॅच हातातून जाईल, असं वाटत असताना कराचीच्या स्पिनर्सनी अचूक टप्प्यावर बॉलिंग करत कमबॅक केले आणि क्वेटाच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. मॅच संपल्यानंतर कॅप्टन डेविड वॉर्नरने आपल्या रणनीतीचा खुलासा केला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PSL 2026 : 'मी चूक केली पण...', डेव्हिड वॉर्नरने कुणाला दिलं विजयाचं क्रेडिट? सांगितला मॅचचा टर्निंग पाईंट!
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement