advertisement

PSL 2026 : ओपनिंग मॅचमध्ये पाकिस्तानच्या गरिबीची पोलखोल! व्हाईट बॉल अचानक झाला गुलाबी, दुसऱ्याच ओव्हरमध्ये काय घडलं?

Last Updated:

Pakistan Super League Pink Ball : पाकिस्तान प्रिमियर लीगच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तान क्रिकेटच्या गरिबीची पोलखोल झाली आहे. पहिल्या मॅचच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये बॉल गुलाबी झाला.

PSL 2026 Opening Match White ball turns into pink Ball
PSL 2026 Opening Match White ball turns into pink Ball
PSL 2026 Opening Match pink Ball : बीसीसीआयला सोन्याची कोंबडी देणारी आयपीएल आता 19 व्या सिझनमध्ये पोहोचली आहे. अशातच पाकिस्तानने देखील पैसा कमवण्यासाठी सुरू केलेली पाकिस्तान प्रिमियर लीग पीसीबीसाठी फुसका बॉम्ब निघाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला याच पीसीएलमुळे आता खाली मान खालण्याची वेळ आली आहे. सध्या पीसीएलच्या 11 व्या सिझनच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तान क्रिकेटच्या गरिबीचं प्रदर्शन पहायला मिळालं. त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच...

मॅचच्या दुसऱ्या ओव्हरमध्येच एक घटना घडली. मैदानावर उपस्थित असलेले अंपायर्स आणि खेळाडू हे दृश्य पाहून अवाक झाले. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पांढरा बॉल खेळ सुरू असताना अचानक गुलाबी झाल्याचं पहायला मिळालं. सोशल मीडियावर या 'पिंक बॉल'चे फोटो तुफान व्हायरल होत असून पाकिस्तान क्रिकेटवर जगभरातून टीका केली जातीये. तसेच पाकिस्तानचं नाक देखील कापलं गेलंय.
advertisement
advertisement

व्हाईट बॉल पाहता पाहता गुलाबी झाला

विचित्र घटनेमागील मूळ कारण हैदराबाद किंग्समॅन टीमची जर्सी असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावरील दाव्यानुसार, हैदराबादच्या बॉलरने बॉल चमकावण्यासाठी तो वारंवार आपल्या जर्सीवर रगडला. जर्सीचा रंग अतिशय खराब क्वालिटीचा असल्यानं रंग बॉलला लागला आणि व्हाईट बॉल पाहता पाहता गुलाबी झाला. खराब क्वालिटीच्या कपड्यांमुळे चक्क मॅचचा बॉलच रंगला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
advertisement

कॅप्टन मार्नस लाबुशेन काय म्हणाला?

हैदराबाद किंग्समॅनचा कॅप्टन मार्नस लाबुशेन यानेही या प्रकारानंतर आपली प्रतिक्रिया दिली. लाबुशेन म्हणाला, "दुसऱ्या ओव्हरनंतर मी अंपायर्सना विचारले की हे नक्की काय सुरू आहे? बॉलचा रंग लाल-गुलाबी झाला होता. कपड्यांचा रंग लागल्यामुळे कदाचित असे घडले असावे, पण माझ्या संपूर्ण करिअरमध्ये मी असा प्रकार कधीच पाहिला नाही.", असं कॅप्टन मार्नस लाबुशेन म्हणाला.
advertisement

हैदराबाद किंग्समेनचा 69 धावांनी पराभव

दरम्यान, शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील लाहोर कलंदर्सने, मार्नस लॅबुशेनच्या नेतृत्वाखालील हैदराबाद किंग्समेनचा 69 धावांनी पराभव केला. पहिल्या डावात लाहोर कलंदर्सने 20 ओव्हरमध्ये 199 धावा उभारल्या, ज्यामध्ये फखर जमानने सर्वाधिक 53 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात, हैदराबाद किंग्समेनला केवळ 130 धावाच करता आल्या. त्यानंतर फखरला 'प्लेयर ऑफ द मॅच' म्हणून घोषित करण्यात आलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PSL 2026 : ओपनिंग मॅचमध्ये पाकिस्तानच्या गरिबीची पोलखोल! व्हाईट बॉल अचानक झाला गुलाबी, दुसऱ्याच ओव्हरमध्ये काय घडलं?
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement