प्लॉट विक्रीतून बिनसलं, पत्नीनं भावाला बोलावलं अन् पतीला..., छ. संभाजीनगरात राडा
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: कर्ज असल्याने पत्नीच्या नावावरचा प्लॉट विकून ते पैसे भरण्याचा विचार करत होते.
छत्रपती संभाजीनगर: प्लॉट विक्रीच्या कारणावरून पत्नी आणि मेव्हण्याने पतीला बेदम मारहाण केली. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल परिसरातील राधास्वामी कॉलनीत हा धक्कादायक प्रकार घडला. प्रणिता भाऊसाहेब शेळके, अक्षय प्रकाश काळे आणि त्यांचे दोन साथीदार अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी पती भाऊसाहेब संपतराव शेळके (वय 41) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं घडलं काय?
भाऊसाहेब शेळके हे एका ट्रॅव्हल्स कंपनीत चालक म्हणून काम करतात. त्यांच्यावर कर्ज असल्याने पत्नीच्या नावावरचा प्लॉट विकून ते पैसे भरण्याचा विचार करत होते. 21 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी याबाबत पत्नी प्रणिता यांना सांगितलं. अंबरहिल येथील प्लॉट विकून कर्ज फेडण्यास पत्नीने विरोध केला.
advertisement
“तुम्ही कसे प्लॉट विकता, मी माझ्या भावाला बोलावून घेते,” म्हणत प्रणिता यांनी भाऊ अक्षय काळे याला बोलावून घेतले. त्यानंतर पत्नी प्रणिता आणि अक्षय या दोघांनी पती भाऊसाहेब शेळके यांना शिवीगाळ केली. तसेच “तू प्लॉट कसा विकतो, आम्ही पाहतो,” असे म्हणत त्यांना शेजारच्या रिकाम्या प्लॉटवर नेले. तिथे पत्नी, मेव्हणा आणि इतर दोघांनी लाकडी दांडक्याने त्यांच्या पायांवर, बरगडीवर मारहाण केली.
advertisement
मारहाणीनंतर शेळके यांना गंभीर जखमी अवस्थेत गाडीत बसवले. तसेच हर्सुल जेलच्या मोकळ्या मैदानात सोडले. तू पुन्हा गल्लीत दिसल्यास जिवे मारू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 8:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
प्लॉट विक्रीतून बिनसलं, पत्नीनं भावाला बोलावलं अन् पतीला..., छ. संभाजीनगरात राडा








