पत्नी-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी पडली महागात, प्रकरण अंगलट, छ. संभाजीनगरात राडा
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: तू आमच्या पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी का करतो?’ असा जाब विचारात एकाला मारहाण करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर: पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करायला जाणं एकाला चांगलंच महागात पडलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाला कमरेच्या बेल्टने मारहाण करण्यात आली. यामध्ये 29 वर्षीय तरुण जखमी झाला असून प्रमोद भास्कर तांगडे याने थेट पोलिसांत धाव घेतली. रात्री 8.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली.
छत्रपती संभाजीनगरमधील सनी सेंटर परिसरात रात्रीच्या सुमारास दोघांत राडा झाला. ‘तू आमच्या पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी का करतो?’ असा जाब विचारात एकाला मारहाण करण्यात आली. श्रीमंत मगरे असे मारहाण करणाऱ्याचे नाव असून तो जटवाडा रोडवर अंबरहिल परिसरात राहतो. त्याच्या विरोधात प्रमोद तांगडे याने सिडको पोलिसांत फिर्याद दिली आहे.
advertisement
नेमकं घडलं काय? प्रमोद तांगडे सेंट्रिंग काम करतात. ते जालना जिल्ह्यातील चानकपुरी येथे आई व आजीला सोडण्यासाठी गावी गेले होते. त्यानंतर 23 मार्च रोजी ते रात्री साडेआठच्या सुमारास भाचा सतीशला उस्मानपुरा भागात सोडून घरी जात होते. त्यावेळी आंबेडकर चौकातून सनी सेंटरकडे जाताना एक अपघात झाला होता. तेव्हा ते अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी थांबले होते.
advertisement
दरम्यान, याचवेळी श्रीमंत मगरे तिथं आला आणि त्याने ‘तू आमच्या पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी का करतो?’ असा सवाल करत मारहाण सुरू केली. कमरेच्या बेल्टने मारहाण केल्याने प्रमोद जखमी झाला आहे. परिसरात या धक्कादायक प्रकाराची चर्चा होती.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 1:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पत्नी-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी पडली महागात, प्रकरण अंगलट, छ. संभाजीनगरात राडा






