काँग्रेस खासदाराच्या गाडीला पहाटे भीषण अपघात, आलिशान फॉर्च्युनर कारचा चक्काचूर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोमवारी पहाटे राजकीय वर्तुळाला हादरवणारी घटना घडली आहे. काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे.
सरवर शेख, प्रतिनिधी भंडारा: सोमवारी पहाटे राजकीय वर्तुळाला हादरवणारी घटना घडली आहे. काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. प्रशांत पडोळे हे सोमवारी पहाटे आपल्या काही सहकाऱ्यांसह नागपूरच्या दिशेनं जात होते. यावेळी त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात पडोळे यांच्या आलिशान फॉर्च्युनर कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात खासदार पडोळे हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली आहे. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र गाडीचा समोरील भागाचं पूर्णतः नुकसान झालं आहे.
सध्या दिल्ली येथे अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनात सहभागी होण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे हे भंडाऱ्यावरून नागपूर विमानतळावर जात होते. यावेळी अचानक रस्त्यात ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले आहेत. ते सध्या सुखरूप आहेत. मात्र गाडीचा काही भाग पूर्णतः चक्काचूर झाला आहे. याच मार्गावर हा तिसऱ्यांदा अपघात घडला आहे.
Location :
Bhandara,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 8:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेस खासदाराच्या गाडीला पहाटे भीषण अपघात, आलिशान फॉर्च्युनर कारचा चक्काचूर










