Refined Oil Risks : पुऱ्या खाताय, तेही रिफाइंड ऑईलमध्ये तळलेल्या? त्वचा आणि केसांवर होतो असा परिणाम..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
रिफाइंड ऑइल आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतं. कारण त्याची बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि हे तेल बनवायच्या प्रक्रियेदरम्यान या तेलामध्ये पोषक तत्व जवळपास नाहीसे होतात.
मुंबई : आपण रोज तळलेल्या पुऱ्या खात नसलो, तरीही आपल्याला सणावाराला का होईना पुरी लागतेच. महिन्यातून एखादेवेळी किंवा फार फार तर दोनदा पुऱ्या खाल्ल्याने दुष्परिणाम होत नाही. पण तुम्ही वारंवार पुऱ्या खात असाल आणि तेही रिफाइंड ऑईलमध्ये तळलेल्या तर हे केवळ तुमच्या वजनासाठीच नाही तर तुमची त्वचा आणि केसांसाठीही घातक ठरू शकतं.
रिफाइंड ऑइल आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतं. कारण त्याची बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि हे तेल बनवायच्या प्रक्रियेदरम्यान या तेलामध्ये पोषक तत्व जवळपास नाहीसे होतात. त्यानंतर तेलामध्ये उरतं ते म्हणजे फक्त फॅट. हे फॅट पुरीसोबत आपल्या पोटात जातं. याचा परिणाम आपल्या आरोग्यासोबत त्वचा आणि केसांवरही होतो.
लंबक पुर्याचा नाही, रिफाइंड तेलात शिजवलेला प्रत्येक पदार्थ आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ रिफाइंड तेलाऐवजी कोल्ड प्रेस ऑइल, तूप किंवा ऑलिव्ह ऑइल वापरण्याचा सल्ला देतात.
advertisement
रिफाइंड तेलातल्या पुऱ्या खाण्याचे दुष्परिणाम..
- रिफाइंड तेलात तळलेल्या पुऱ्या खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. दीर्घकाळ या तेलाचा वापर केल्यास शरीरात विविध प्रथिनांची कमतरता निर्माण होते. आणि यामुळे व्यक्ती वारंवार आजारी पडू शकते.
- रिफाइन्ड तेलात शिजवलेल्या भाज्या किंवा पुऱ्या खाल्ल्याने त्वचेच्या समस्या होऊ शकतात. तज्ज्ञांच्यामते, अशा तेलाच्या सततच्या वापरामुळे त्वचेवर सुरकुत्या, कोरडेपणा आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्या होऊ शकतात.
advertisement
- रिफाइन्ड तेलात बनवलेले अन्न खाल्ल्याने हृदयाच्या समस्याही वाढू शकतात. याच्या अतिवापराने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू शकते. जे लोक रोजच्या आहारात रिफाइन्ड तेलाचा वापर करतात, त्यांच्या शरीरात पुरेशा प्रमाणात एचडीएल तयार होत नाही, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
- रिफाइन्ड तेलामुळे वजन वाढू शकतं. आधीच जास्त वजन असलेल्या किंवा फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्यांनी रिफाइन्ड तेल अजिबात वापरू नका. लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हरचा त्रास वाढू नये म्हणून निरोगी आहार घ्या. यासाठी सर्वात आधी आहारातून रिफाईंड तेल काढून टाका.
advertisement
- रिफाइन्ड तेल रोज वापरल्यास हाय कोलेस्ट्रॉलचा धोकाही वाढू शकतो. हल्ली सर्वांकडे रिफाइन्ड तेल वापरलं जातं. या तेलाच्या नियमित वापरामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच रिफाइन्ड तेलाऐवजी मोहरीचं तेल, शुद्ध तूप किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 8:31 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Refined Oil Risks : पुऱ्या खाताय, तेही रिफाइंड ऑईलमध्ये तळलेल्या? त्वचा आणि केसांवर होतो असा परिणाम..








