advertisement

एक कॉल अन् आयुष्यभराची जमापुंजी गायब, वृद्ध दाम्पत्याला 2.84 कोटीला फसवलं, नेमकं काय घडलं?

Last Updated:

आयुष्यभर कष्ट करून जमा केलेली बचत एका फोन कॉलमुळे गमवावी लागल्याने या प्रकरणाने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. या घटनेप्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ज्येष्ठ दाम्पत्याची २.८४ कोटींची फसवणूक
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ज्येष्ठ दाम्पत्याची २.८४ कोटींची फसवणूक
मुंबई : मुंबईतील कांजूरमार्ग परिसरात एका ज्येष्ठ दाम्पत्याची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 2.84 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभर कष्ट करून जमा केलेली बचत एका फोन कॉलमुळे गमवावी लागल्याने या प्रकरणाने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. या घटनेप्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार 77 वर्षीय निवृत्त व्यक्ती आपल्या 72 वर्षीय पत्नीसोबत कांजूरमार्ग येथे राहतात. त्यांची पत्नी सहकार आणि पणन विभागातून वरिष्ठ स्वीय सहाय्यक म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यांचा मुलगा परदेशात शिक्षणासाठी आहे. गेल्या वर्षी 16 डिसेंबर रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्या बँक खात्यातील व्यवहार संशयास्पद असल्याचा दावा केला.
advertisement
त्या व्यक्तीने दाम्पत्याला सांगितले की त्यांच्या आधारकार्ड आणि बँक खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशात अटक करण्यात आलेल्या एका संशयिताने त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे खाते उघडल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे असल्याचे भासवून त्यांना डिजिटल अरेस्टमध्ये असल्याची भीती दाखवण्यात आली.
यानंतर सतत संपर्कात राहून आरोपींनी दाम्पत्यावर मानसिक दबाव टाकला. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आणि चौकशीसाठी सहकार्य करण्याच्या नावाखाली त्यांनी विविध खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. महिनाभर चाललेल्या या फसवणुकीत दाम्पत्याने एकूण 2.84 कोटी रुपये गमावले.
advertisement
शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकारामुळे नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
एक कॉल अन् आयुष्यभराची जमापुंजी गायब, वृद्ध दाम्पत्याला 2.84 कोटीला फसवलं, नेमकं काय घडलं?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement