Jambhul Benefits: जांभूळ खाल्ल्याने खरंच मधुमेह नियंत्रणात येतो का? तज्ज्ञांनी दिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर

Last Updated:

जांभूळ खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. मधुमेहासाठी तर जांभूळ ही अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले जाते.

+
जांभूळ

जांभूळ

जालना: बाजारामध्ये आता जांभूळ भरपूर प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. जांभूळ खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. मधुमेहासाठी तर जांभूळ ही अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. परंतु खरोखरच जांभळाच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो का? याबाबत आहार सल्लागार अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
जांभळामध्ये बऱ्याच प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठता आहेअपचन आहेपचनाचा त्रास आहेऍसिडिटी आहेत्यांच्यासाठी जांभूळ अत्यंत उपयुक्त आहे. जांभळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर वृद्धत्व आणि हृदयाशी निगडित असलेले आजार कमी होण्यास मदत होते.
advertisement
जांभळामध्ये पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात आढळते. पोटॅशियम हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी आणि मांसपेशींना शक्ती पुरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. अनेकांचा असा गैरसमज असतो की मधुमेहींसाठी जांभूळ ही खूप उपयोगी आहे.
परंतु थेट जांभूळ सेवनापेक्षा जांभूळ फळातील बियांचा उपयोग रक्तातील शर्करा कमी करण्यासाठी होतो. जांभूळ फळांमध्ये फ्रुक्टोज ही नैसर्गिक साखर असते. त्यामुळेच थेट जांभळाच्या सेवनाने साखर नियंत्रणात आणण्यासाठी फारसा फायदा होत नाही. तर जांभूळ बीजामध्ये जंबुलिन आणि जंबोसिन हे घटक असतात. हे घटक स्टार्चला ग्लुकोजमध्ये बदलण्यास रोखतात.
advertisement
त्यामुळे जांभूळ बीज हे मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे मधुमेहांनी थेट जांभळाचे सेवन करण्याऐवजी जांभूळ बीजाच्या पेस्टचे दररोज सेवन केल्यास फायदा होऊ शकतोअसं आहार सल्लागार अमृता कुलकर्णी यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Jambhul Benefits: जांभूळ खाल्ल्याने खरंच मधुमेह नियंत्रणात येतो का? तज्ज्ञांनी दिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement