TRENDING:

Ahilyanagar Accident: दोन दिवसांपूर्वी नवी कोरी अलिशान कार घेतली, देवदर्शनाला जाताना चौघांचा मृत्यू

Last Updated:

श्रीरामपूरच्या चव्हाण कुटुंबाची नवी कार खंडाळ्याजवळ ट्रकच्या धडकेत चुरडली, चौघांचा मृत्यू, दोन चिमुकले व एक महिला गंभीर जखमी, आनंदावर दु:खाचा डोंगर.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
हरिष दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर: दोन दिवसांपूर्वी नवी कोरी कार घरात आली. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. तिच नवीन कार घेऊन देवदर्शनाला जाण्याचा प्लॅन ठरला. साईबाबांच्या दर्शनाला जाऊ आणि मगच कार वापरू' ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून सगळ्यंनी आवरलं आणि निघाले, प्रवास अगदी आनंदात सुकर सुरू होता आणि पुढच्याच क्षणी भयंकर घडलं. कुणाला ठाऊक होते, की ज्या आनंदासाठी ही गाडी घेतली, तीच गाडी त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरेल? बुधवारी सायंकाळी खंडाळ्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात चव्हाण कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन चिमुकले आणि एक महिला मृत्यूशी झुंज देत आहे.
News18
News18
advertisement

कुटुंबियांच्या आनंदावर विरजण

श्रीरामपूर इथे चव्हाण कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहाने नवीन कार खरेदी केली होती. या नवीन कारमधून सहकुटुंब शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी ते घरून निघाले. घराबाहेर पडताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, बाभळेश्वर-श्रीरामपूर रस्त्यावर खंडाळ्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला भीषण धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, नव्या कोऱ्या कारचा अक्षरशः चुराडा झाला.

advertisement

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

या भीषण धडकेत चव्हाण कुटुंबातील चार सदस्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या घरात दोन दिवसांपूर्वी नवीन गाडीच्या पूजेचे पेढे वाटले गेले होते, तिथे आता फक्त आक्रोश आणि शांतता उरली आहे.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, काळाने आपला डाव साधला होता.

दोन चिमुकले गंभीर जखमी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ना खत, ना पाणी, नुसत्या हवेवर पिकतोय गहू, सांगलीच्या खास शेतीचा Ground Report
सर्व पहा

या अपघातातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे कारमध्ये असलेली दोन लहान मुले आणि एक महिला गंभीर जखमी झाले आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या चिमुकल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या आई-वडिलांच्या कुशीत हे मुलं दर्शनाला निघाले होते, तीच आता त्यांच्यासोबत नाहीत, हे सत्य या लेकरांना कसे सांगायचे? या विचारानेच मदत करणाऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी आलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahilyanagar Accident: दोन दिवसांपूर्वी नवी कोरी अलिशान कार घेतली, देवदर्शनाला जाताना चौघांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल