TRENDING:

अजित पवारांनी संग्राम जगतापांना नोटीस दिली, नगरमध्ये वातावरण तापले, हिंदूंच्या दुकानासमोर भगवे झेंडे

Last Updated:

Sangram Jagtap: अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण तापले आहे. राज्यभरातून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर : दिवाळीत हिंदू बांधवांनी हिंदूंकडूनच खरेदी करा, असे विधान अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केल्यानंतर त्याचे पडसाद शहरात उमटलेले दिसून आले. फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या मूळ विचारधारेला जगताप यांच्या विधानांनी धक्का लागत असल्याने त्यांना कारणे दाखवे नोटीस बजावलेली आहे. दुसरीकडे अहिल्यानगरचे हिंदुत्त्ववादी व्यावसायिक आणि संघटना त्यांच्या मागे ठामपणे उभ्या आहेत.
संग्राम जगताप
संग्राम जगताप
advertisement

अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण तापले आहे. राज्यभरातून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, हिंदुत्ववादी संघटनांनी संग्राम जगताप यांना समर्थन देत प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून प्रतिसाद दिला आहे.

अहिल्यानगर शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर भगवे झेंडे लावून समर्थन दर्शवले. खरेदी करण्याला हे हिंदूच दुकान आहे हे समजावे म्हणून झेंडे लावल्याचं बोललं जातेय. काही आकाश कंदिलांवर संग्राम जगताप यांचे फोटो लावून हिंदुत्त्ववादी संग्राम जगताप अशा आशयाचा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे. हिंदूंनी हिंदूंकडून नाही तर कुणाकडून खरेदी करायची, असे प्रश्नही हिंदुत्त्ववादी संघटना विचारीत आहेत.

advertisement

संग्राम जगताप यांना हिंदुत्ववादाची भुरळ कशी पडली? जहाल हिंदुत्त्ववादी नेते बनण्याचा भैय्यांचा प्रवास

पुरोगामी विचारांनी राजकारणात पदार्पण करणाऱ्या संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर शहारतले दिग्गज शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री अनिल भैय्या राठोड यांचे प्रस्थ मोडीत काढले. अनिल भैय्यांना पराभवाची धूळ चारणे भल्याभल्यांना जमली नाही, ती संग्राम जगताप यांनी करून दाखवली. त्यावेळी शिवसेना आणि भाजप वेगळी लढल्याचा थेट फायदा संग्राम जगतापांना झाला होता. एकीकडे हिंदू मते विभागली गेली आणि एकगठ्ठा मुस्लिम मते त्यांच्या पारड्यात पडली होती. या अटीतटीच्या लढतीत ३ हजार ३१७ मतांनी संग्राम जगताप यांनी अनिल राठोड यांचा पराभव केला होता. अनिल भैय्या राठोड यांचा पराभव करून संग्राम जगताप पहिल्यांदा २०१४ साली आमदार म्हणून निवडून आले.

advertisement

यानंतर २०१९ साली पुन्हा एकदा त्यांच्यासमोर शिवसेनेचे अनिल राठोड यांनी आव्हान दिले. यावेळीही संग्राम जगताप यांनी ११ हजार १३९ मतांनी अनिल राठोड यांचा पराभव केला. त्यावेळी सर्वसमावेश विचार घेऊन, पुरोगामी विचारांचा पुरस्कार करूनच संग्राम जगताप निवडणुकीला सामोरे गेले होते.

मात्र २०२४ त्या निवडणुकीत संग्राम जगताप यांनी भाजपला साथ दिलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. त्यामुळे मुस्लिम समाजाने जगताप यांना साथ देणे टाळले. असे असतानाही शरद पवार गटाच्या अभिषेक कळमकर यांना संग्राम जगताप यांनी जवळपास ४० हजार मतांनी पराभूत केले. २०२४ च्या निवडणुकीत हिंदू मतदारांनी जगताप यांना मोठ्या संख्येने साथ दिली. मुस्लिम समाजाने मतदान केले नाही, अशी खंत किंबहुना तक्रार उघड बोलून दाखवत त्यावेळीपासून संग्राम जगताप यांनी मुस्लिमांविरोधात मोर्चा उघडला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! तुमच्या फोटोचा कुणी गैरवापर तर करत नाही ना? नवा Scam समोर
सर्व पहा

खरे तर अहमदनगर शहर हा मतदारसंघ अनिल भैय्या राठोड यांच्यामुळे हिंदुत्त्वाचा बालेकिल्ला राहिला. आता त्यांच्या जाण्यानंतर प्रखर हिंदुत्त्ववादी भूमिका घेऊन, हिंदुत्वाचा प्रवास जोमाने सुरू ठेवून पुढचा काही काळ निवडून येण्याची गुंतवणूक जगताप करीत आहेत, असे राजकीय जाणकार सांगतात.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांनी संग्राम जगतापांना नोटीस दिली, नगरमध्ये वातावरण तापले, हिंदूंच्या दुकानासमोर भगवे झेंडे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल