आजाराला कंटाळून गळा आवळून हत्या
पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. या तीन महिन्यांच्या बालकाला मणक्याचा गंभीर आजार होता. या आजाराला कंटाळून आई-वडिलांनीच गळा आवळून त्याची हत्या केली आणि त्यानंतर त्याचे प्रेत नदीच्या पुलाखाली फेकून दिले. कविना जाधव हिच्या नातेवाइकांनी या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
नातेवाईकांनी रचला बनाव
या घटनेमुळे गावात लोकांना शंका येऊ नये, यासाठी कविना जाधव हिच्या नातेवाइकांनी गावात खोटी माहिती पसरवली होती. त्यांनी लोकांना सांगितले की, बाळाचे छत्रपती संभाजीनगर येथे ऑपरेशन झाले आहे आणि त्याला तीन ते चार दिवसांत हॉस्पिटलमधून सोडण्यात येईल. तसेच, बाळाबाबत लोक विचारणा करतील म्हणून कविना हिला वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनासाठी पाठवले होते, जेणेकरून या गुन्ह्यामागचे सत्य बाहेर येऊ नये.
शिवांशच्या जन्मापासूनच त्याच्या कान आणि हातात अपंगत्व असल्याचे समोर आले होते. हे अपंगत्व कधीही बरे होणार नसल्याने आणि बाळ नको असल्यानेच दांपत्याने हा भयावह निर्णय घेतल्याचे त्यांनी कबूल केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्याच्या दिशेने जाताना त्यांना घारगाव जवळ मुळा नदी दिसली आणि त्याचं वेळी त्यांनी स्वतःची चारचाकी गाडी बाजूला लावून शिवांशला झूडपात फेकून दिलं, असंही पोलिसांनी सांगितलं.
गोपनीय तपास केला असता मृतक आणि त्याचे नातेवाईक यांची माहिती मिळाली. त्यानंतर प्रकाश पंडित जाधव (३७, रा. भिवपूर), कविता प्रकाश जाधव (३२) आणि हरिदास गणेश राठोड (३२, रा. आव्हाणा) यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
