नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर पंचायत समिती कार्यालयात दैनंदिन कामकाज सुरू असताना ही घटना घडली. शरद नाना थोरात हे आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात आले आणि त्यांनी थेट तालुका अभियान व्यवस्थापकाला लक्ष्य केले. यावेळी झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही आणि मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
advertisement
पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेनंतर पीडित कर्मचाऱ्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रात्री उशिरा शरद नाना थोरात यांच्यासह इतर ९ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शासकीय कामात अडथळा आणणे यासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मारहाणीचे कारण अद्याप गुलदस्त्यात
एक शासकीय अधिकारी आणि प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील व्यक्ती यांच्यात हा वाद नेमका कशामुळं झाला, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राजकीय वर्चस्वातून हा प्रकार घडला की वैयक्तिक कारणातून, याचा तपास आता संगमनेर शहर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
