TRENDING:

दारू दुकानांसाठी आता ही गोष्ट बंधकारक, अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

Last Updated:

किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या स्थलांतरासाठी अजित पवार यांनी नियमावली जाहीर केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : राज्यात एफ. एल–2 आणि सी. एल–3 परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एनओसी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
अजित पवार
अजित पवार
advertisement

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार बोलत होते. किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या स्थलांतरासाठीचे काही नियम त्यांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वप्नांचा झाला 'लाल चिखल', टोमॅटोला भाव नसल्यामुळे 2.50 लाखांचं नुकसान, Video
सर्व पहा

पवार म्हणाले की, संबंधित दुकान सोसायटी परिसरात असेल तर सोसायटीची संमती नसल्यास स्थलांतरास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. एफएल–2 आणि सीएल–3 परवान्यांबाबत ही अट आता काटेकोरपणे लागू राहील. पिंपरी-चिंचवड येथील कोळीवाडा आणि रहाटणीतील दोन अनधिकृत दारू दुकाने निलंबित करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यापैकी एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, तर एका दुकानावर यापूर्वी रुपये 50,000 दंड आकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दारू दुकानांसाठी आता ही गोष्ट बंधकारक, अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल